महाराष्ट्रातली महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार, मंत्री उदय सामंत यांची घोषणा
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या शाळांपाठोपाठ राज्यातली महाविद्यालयंही बंद असणार आहेत. मुंबईसह राज्यभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत यांनी जाहीर केलं आहे. मुंबईतल्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या शाळांपाठोपाठ राज्यातली महाविद्यालयंही बंद असणार आहेत. मुंबईसह राज्यभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत यांनी जाहीर केलं आहे. मुंबईतल्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला होताच. आता मुंबईसह राज्यातील महाविद्यालयंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत मंगळवारी दहा हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसंच राज्यातली संख्याही जास्त होती. आजही ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉन या व्हेरिएंटचे रूग्णही मुंबईत जास्त आहेत. त्यामुळे खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. तसंच लसीकरणही वाढवण्यावर भर दिला जातो आहे. अशात आता खबरदारीचा उपाय म्हणून पहिली ते नववी पर्यंतच्या शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. त्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू असणार आहे.
कोरोना रूग्ण वाढल्याने औरंगाबादमधल्या पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद