LPG Cylinder Price Hike: बाहेरचं जेवण महागणार?; व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

मुंबई तक

देशात ऐन दिवाळीत महागाईची आतषबाजी सुरू आहे. पेट्रोल-डिझेलसह महागाईच्या झळा सोसणाऱ्यांना आणखी एक झटका बसला आहे. दिवाळीची लगबग सुरू असतानाच पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. 19.2 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत 266 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (LPG commercial Cylinder price hike) पेट्रोल-डिझेलसह इतर वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढत असून, सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडू लागला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देशात ऐन दिवाळीत महागाईची आतषबाजी सुरू आहे. पेट्रोल-डिझेलसह महागाईच्या झळा सोसणाऱ्यांना आणखी एक झटका बसला आहे. दिवाळीची लगबग सुरू असतानाच पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. 19.2 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत 266 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (LPG commercial Cylinder price hike)

पेट्रोल-डिझेलसह इतर वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढत असून, सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडू लागला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज वाढत असून, आता बाहेरचं जेवणही महागण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या 19.2 किलोच्या सिलेंडरच्या किंमती 266 रुपयांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे देशभरातील व्यावसायिक सिलेंडरचे दर महागले आहेत. दरम्यान, घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ न झाल्यानं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

6 ऑक्टोबर रोजी झालेल्या आढावा बैठकीवेळी व्यावसायिक सिलेंडरचे दर 1736.50 रुपये होते. पण नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी सिलेंडर तब्बल 266 रुपयांनी महागला आहे. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार दिल्लीत आता व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 2000.5 रुपये झाली आहे. तर मुंबईत व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1950 रुपयांवर पोहोचली आहे.

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याची झळही सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. व्यावसायिक सिलेंडर महागल्यानं रेस्तराँ आणि बाहेरील खाद्य पदार्थांचे दर महागण्याची शक्यता आहे. कारण महागलेल्या पालेभाज्या आणि खाद्य तेलाचे दर प्रचंड वाढलेले असतानाच व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढल्याने व्यावसायिकांकडून खाद्य पदार्थांचे दर वाढू शकतात.

घरगुती वापराच्या सिलेंडरचे दर स्थिर आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 6 ऑक्टोबर रोजी 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात जुलैपासून 90 रुपयांनी वाढले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp