Congress President Election : शशी थरूर यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहे?
राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अखेर निवडणूक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १९ ऑक्टोबरला काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल. काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक कोण लढवणार यावरून आता वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. सुरूवातीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव चर्चेत आलं होतं. आता खासदार शशी थरूर यांच्या […]
ADVERTISEMENT

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अखेर निवडणूक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १९ ऑक्टोबरला काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल. काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक कोण लढवणार यावरून आता वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. सुरूवातीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव चर्चेत आलं होतं. आता खासदार शशी थरूर यांच्या नावाची चर्चा सुरू झालीये.
काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. निवडणूक कार्यक्रमानुसार १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून, १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे काँग्रेसचं अध्यक्षपदावर पुन्हा गांधी कुटुंबातील व्यक्ती बसणार की, बाहेरचा याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरूर यांचं नाव का चर्चेत आलंय?
अशोक गेहलोत यांनी अध्यक्ष व्हावं, अशी सोनिया गांधी यांची इच्छा असल्याची माहिती समोर आली होती. गेहलोत यांनी मात्र, राहुल गांधींनी ही जबाबदारी घ्यावी, अशी भूमिका मांडली. गेहलोत यांच्याभोवतीची चर्चा थांबण्याआधीच काँग्रेसचे केरळातील खासदार शशी थरूर यांचं नाव चर्चेत आलं.
काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळणार? अशोक गेहलोत यांची का होतेय चर्चा?