लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?

मुंबई तक

ओमिक्रॉन या व्हेरिएंटमुळे हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यू यांचा धोका कोरोनाच्या दुसऱ्या व्हेरिएंटच्या तुलनेत कमी झाला आहे. या प्रकरणी आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुलांबाबत चिंता व्यक्त केली आहे. ओमिक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त घातक आहे असं म्हटलं आहे. तोंड, नाक, घसा यामध्ये या व्हेरिएंटचे विषाणू ग्रासत असतात. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्टवर तो जास्त परिणाम करतो असंही तज्ज्ञांनी म्हटलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ओमिक्रॉन या व्हेरिएंटमुळे हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यू यांचा धोका कोरोनाच्या दुसऱ्या व्हेरिएंटच्या तुलनेत कमी झाला आहे. या प्रकरणी आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुलांबाबत चिंता व्यक्त केली आहे. ओमिक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त घातक आहे असं म्हटलं आहे. तोंड, नाक, घसा यामध्ये या व्हेरिएंटचे विषाणू ग्रासत असतात. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्टवर तो जास्त परिणाम करतो असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे ओंमिक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत लहान मुलांसाठी घातक असल्याचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

श्री बालाजी अॅक्शन मेडिक इन्स्टिट्युट दिल्ली येथील रेस्पिरेसटी मेडिसीन विभागात करणारे अनिमेश आर्या म्हणाले की लहान मुलांचा श्वास नलिकेचा मार्ग हा वयस्कर माणसांच्या तुलने लहान असतो. त्यामुळे कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन हा त्यांच्यावर जास्त परिणाम करू शकतो. या व्हेरिएंटमुळे लहान मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यता असते.

AIIMS ने सांगितली ओमिक्रॉनची पाच धोकादायक लक्षणं, दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा

नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गुरुग्राम येथील वरिष्ठ कंसल्टंट तुषार तायल यांनीही या विषयी मत मांडलं आहेत. कोरोनाचा ओमिक्रॉन हा व्हेरिएंट इतर दोन व्हेरिएंट्सच्या तुलनेत लहान मुलांवर जास्त प्रभाव पाडणारा ठरतो आहे. या व्हेरिएंटमुळे जास्तीत जास्त लहान मुलं कोरोनाग्रस्त होत आहेत. या व्हेरिएंटमुळे लहान मुलांमध्येही मोठ्या माणसांप्रमाणेच ताप येणे, सर्दी होणे, खोकला होणे ही लक्षणं पाहण्यास मिळत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp