मोठी बातमी! 3 जानेवारीपासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरतोय असं वाटत असतानाच ओमिक्रॉन या व्हेरिएंटने डोकं वर काढलं. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. महाराष्ट्रात रूग्णसंख्या वाढू लागली आहे. देशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. विशेष बाब म्हणजे लस घेतलेल्यांनाही कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे असंही समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ते […]
ADVERTISEMENT

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरतोय असं वाटत असतानाच ओमिक्रॉन या व्हेरिएंटने डोकं वर काढलं. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. महाराष्ट्रात रूग्णसंख्या वाढू लागली आहे. देशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. विशेष बाब म्हणजे लस घेतलेल्यांनाही कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे असंही समोर आलं आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ते पाऊल आहे लसीकरणाचं. ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स या सगळ्यांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. तर 15 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलांनाही लस देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे.
Omicron Variant : कोरोनाच्या व्हेरिएंटवर लस किती प्रभावी? लसीकरण झालेल्यांनाही ओमिक्रॉनचा धोका?
आता 3 जानेवारीपासून म्हणजेच पुढच्या सोमवारपासून 15 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण सुरू केलं जाणार आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्यांना कोव्हॅक्सिन ही लस दिली जाणार आहे.