नागपूरकरांनो काळजी घ्या ! Corona रुग्णसंख्यावाढीच्या वेगाने चिंता वाढवली
मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने धडक दिली असून वाढणारी रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनची चिंता यामुळे राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत. एकीकडे मुंबईतली रुग्णसंख्या वाढ चिंतेचा विषय ठरत असताना उप-राजधानी नागपूरमध्येही दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात नागपुरात ८८ कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट नागपुरकरांसाठी धोक्याची चाहूल घेऊन आलेली आहे. […]
ADVERTISEMENT

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने धडक दिली असून वाढणारी रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनची चिंता यामुळे राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत. एकीकडे मुंबईतली रुग्णसंख्या वाढ चिंतेचा विषय ठरत असताना उप-राजधानी नागपूरमध्येही दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात नागपुरात ८८ कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट नागपुरकरांसाठी धोक्याची चाहूल घेऊन आलेली आहे.
गेल्या आठवडाभराचा कोरोनाच्या रुग्ण वाढीची संख्या बघितली तर रुग्णसंख्या प्रत्येक दिवशी दुप्पटीने वाढत असल्याचं दिसतं आहे. कोरोनाची ही रुग्णवाढ प्रशासनासोबतच नागपूरकरांची सुद्धा चिंता वाढविणारी आहे. नागपुरात आतापर्यंत ओमीक्रोनचे एकूण ६ रुग्ण आढळून आलेले आहेत त्यापैकी ३ रुग्णांनी ओमीक्रोन वर यशस्वी मात केली आहे.. तर बाकी रुग्णांवर नागपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मागील आठवडाभरातील नागपुरातील कोरोना रूग्णांची संख्या –
-
२३ डिसेंबर – ६ रुग्ण