अल्पवयीन मुलगा दोन वर्षांपासून करत होता बलात्कार; १६ वर्षाच्या मुलीने बाळाला दिला जन्म
देशभरात अल्पवयीन मुलींसह महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं चित्र आहे. मध्य प्रदेशात एक अल्पवयीन मुलगा 16 वर्षांच्या मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेनं बाळाला जन्म दिल्यानंतर ही घटना उजेडात आली. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील ही घटना असून, एका अल्पवीयन मुलीने गर्भवती राहिल्यानंतर एका बाळाला जन्म दिला. बाळ […]
ADVERTISEMENT

देशभरात अल्पवयीन मुलींसह महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं चित्र आहे. मध्य प्रदेशात एक अल्पवयीन मुलगा 16 वर्षांच्या मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेनं बाळाला जन्म दिल्यानंतर ही घटना उजेडात आली.
मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील ही घटना असून, एका अल्पवीयन मुलीने गर्भवती राहिल्यानंतर एका बाळाला जन्म दिला. बाळ जन्माला आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. दरम्यान, जन्मानंतर उपचार सुरू असताना नवजात बाळाचा मृत्यू झाला. चिंतेची बाब म्हणजे मुलीचं दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करणारा मुलगाही अल्पवयीन आहे.
१६ वर्षाच्या पीडित मुलीने ओबेदुल्लागंज आरोग्य केंद्रात एका मुलाला जन्म दिला. पीडितेची आणि बाळाची प्रकृती गंभीर असल्यानं आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दोघांना भोपाळमधील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तिथे दाखल केल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला.
या संपूर्ण प्रकरणामुळे ओबेदुल्लागंज आरोग्य केंद्रातील ढिसाळ कारभारही समोर आला. पीडित अल्पवयीन मुलीची प्रसुती केल्यानंतर रुग्णालयाने याची माहिती स्थानिक पोलिसांना दिलीच नाही. घाईतच पीडितेसह मुलाला भोपाळमधील रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवण्यात आलं.