कोल्हापूर : पकडायला गेला मासा आणि गळाला लागली 6 फुटांची मगर; दुधगंगा नदीपात्रातील घटना

मुंबई तक

-दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर गळ टाकून मासाला लागण्याची प्रतिक्षा करत असताना त्याच गळाला मगरीने पकडलं तर…? तर काय पळता भुई थोडीच… असाच प्रकार कोल्हापुरातील कागलमध्ये घडला आहे. कागल येथे दुधगंगा नदी पात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाला आज वेगळाच अनुभव आला. मासे पकडण्यासाठी नदीपात्रात टाकलेल्या गळाला चक्क सहा फुट लांबीची मगर अडकली. त्यामुळं घाबरलेल्या त्या तरूणानं गळ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

-दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर

गळ टाकून मासाला लागण्याची प्रतिक्षा करत असताना त्याच गळाला मगरीने पकडलं तर…? तर काय पळता भुई थोडीच… असाच प्रकार कोल्हापुरातील कागलमध्ये घडला आहे. कागल येथे दुधगंगा नदी पात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाला आज वेगळाच अनुभव आला. मासे पकडण्यासाठी नदीपात्रात टाकलेल्या गळाला चक्क सहा फुट लांबीची मगर अडकली. त्यामुळं घाबरलेल्या त्या तरूणानं गळ टाकून पळ काढला. या घटनेची आणि दुधगंगा नदीपात्रातील मगरीच्या वावराची चर्चेचा जोरात सुरू असून, भीतीचं वातावरण आहे.

मासे पकडण्यासाठी नदीपात्रात टाकलेल्या गळाला मासे, खेकडे आणि कासव लागल्याचं ऐकायला मिळालं होतं. मात्र कागल शहरातील एक तरुण आज दुधगंगा नदीत मासे पकडण्यासाठी गेला असता, त्याच्या गळाला चक्क सहा फुट लांबीची मगर लागली. नदीला बारमाही पाणी असल्यानं दुधगंगा नदीपात्रात मासे पकडण्यासाठी जाणार्‍यांची संख्या मोठी आहे.

एक तरुण माशाच्या पार्टीचा बेत आखत गळ घेऊन दुधगंगा नदीवर गेला. मासे पकडण्यासाठी गळाला माशाचं खाद्य लावून त्यानं गळ नदीपात्रात टाकला. दोन-तीन वेळा गळाला लावलेलं खाद्य मासा खाऊन गेला मात्र, गळाला मासा काही लागला नाही. तरूणानंही हार न मानता पुन्हा गळ नदीपात्रात टाकला.

गळ पाण्यात टाकल्यानंतर गळाला लावलेलं खाद्य कुणीतरी खात असल्याचं तरुणाला जाणवलं. त्यामुळं त्यानं गळ ओढण्यास सुरुवात केली. गळाचा दोरा ओढताना त्याला प्रचंड ताकद लावावी लागली. त्यामुळं गळाला एखादा मोठा मासा लागला असावा, असं त्याला वाटलं. पण, गळ बाहेर ओढल्यानंतर त्या तरूणाची भितीनं बोबडीच वळली. कारण गळाला मासा नव्हे तर चक्क भली मोठी मगरच लागली होती.

मगरीला पाहून घाबरलेल्या त्या तरुणानं गळ तिथंच टाकून पळ काढला. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून, या प्रकाराची आणि दुधगंगा नदीपात्रात मगरीच्या वावराची कागल शहरात चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp