Cyrus Mistry Funeral : मंगळवारी वरळी स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

काल पालघरजवळील चारोटी गावाजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता.
cyrus mistry
cyrus mistry Mumbai Tak

मुंबई : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं काल (रविवारी) अपघाती निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. मिस्त्री यांच्यासह केपीएमजी ग्लोबल स्ट्रेटेजी ग्रुपचे संचालक जहांगीर पंडोले यांचेही या अपघातात निधन झाले. अहमदाबाद-मुंबई महामार्गावर पालघरजवळील चारोटी गावाजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. मिस्त्री यांच्यावर उद्या (मंगळवारी) सकाळी 11 वाजता वरळी स्मशानभुमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अंत्यसंस्काराला सर्व क्षेत्रातील लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, अपघातातनंतर मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मध्यरात्री 2 वाजून 27 मिनिटांनी त्यांचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून सध्या त्यांचे मृतदेह हॉस्पिटलच्या शवागृहातच ठेवण्यात आले आहेत. सायरस यांचे बरेच नातेवाईक विदेशात असून ते आज संध्याकाळपर्यंत भारतात पोहचण्याचा अंदाज आहे.

cyrus mistry
Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्रींच्या मृत्यूचं कारण समोर, डॉक्टर म्हणाले...

पारशी धर्मीय अत्यंविधीला फाटा :

मिस्त्री यांच्यावर वरळी स्मशानभुमीत अत्यंसंस्कार होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पारशी धर्मातील अत्यंविधीच्या पद्धतीनुसार अत्यंसंस्कार होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पारशी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला ‘दोखमेनाशिनी’ म्हणतात.

यात मृतदेह ‘दोखमेनाशिनी’साठी एकांतात नेला जातो, आणि इथे तो मृतदेह गिधाडांसाठी सोडला जातो. यानंतर गिधाड येऊन ते शरीर खातात. त्यांच्यामते असे केल्यानंतरच त्यांना मुक्ती मिळते. या स्मशानभूमीला ‘टॉवर ऑफ साइलेन्स’ असे म्हटले जाते. मात्र मिस्त्री यांच्यावर वरळी स्मशानभुमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

देवदर्शनासाठी गेले होते सायरस मिस्त्री :

अपघातग्रस्त गाडीमध्ये सायरस मिस्त्री यांच्यासह केपीएमजी ग्लोबल स्ट्रेटेजी ग्रुपचे संचालक जहांगीर पंडोले, जेएम फायनान्शियल प्रायव्हेट इक्विटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दरायस पंडोले आणि ब्रीचकँडी रुग्णालयातील ख्यातनाम स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनाहिता पंडोले असे चार जण प्रवास करत होते.

cyrus mistry
Cyrus Mistry Accident: भारतात रस्ते अपघातात दर 4 मिनिटाला 1 मृत्यू, वर्ल्ड बँकेचा अहवाल

हे सर्वजण गुजरातमधील उदवाडा इथे देवदर्शनासाठी गेले होते. वलसाड जिल्ह्यातील उदवाडा हे पारसी समुदायासाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. ज्याप्रमाणे हिंदू धर्मियांमध्ये काशी हे पवित्र स्थान मानले जाते अगदी तेच स्थान पारसी समुदायासाठी उदवाडाचे आहे. इथेच पारसी समुदायाच्या धर्मगुरुंचे वास्तव्य आहे.

याच ठिकाणाहुन सायरस मिस्त्री आणि अन्य तिघे मर्सिडीज गाडीने मुंबईच्या दिशेने परतत होते. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी अनाहिता पंडोले गाडी चालवत होत्या. तर त्यांचे पती दरायस पंडोले हे त्यांच्या शेजारी बसले होते. सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले गाडीत मागील बाजूस बसले होते. दरम्यान, गाडी अहमदाबाद-मुंबई महामार्गावर पालघरनजिक चारोटी गावाजवळ आली असताना सुर्या नदीच्या पुलावर डिव्हायडरला धडकली, आणि यात मागे बसलेल्या मिस्त्रींसह जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in