बीडच्या सुपुत्राचा राजधानी दिल्लीत कर्तव्यावर असताना मृत्यू, हिंगणी गावावर शोककळा

मुंबई तक

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड राजधानी दिल्ली येथे कर्तव्यावर असताना बीड जिल्ह्यातील हिंगणी गावातील जवान अविनाश कल्याण आंधळे वय 29 हे कर्तव्यावर असताना हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आज बीड जिल्ह्यातील हिंगणी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शेतकरी कुटुंबातील असलेले जवान अविनाश हे सहा वर्षांपासून देशसेवा बजावत होते.त्यांच्या निधनाची बातमी समजताच हिंगणी गावासह […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

राजधानी दिल्ली येथे कर्तव्यावर असताना बीड जिल्ह्यातील हिंगणी गावातील जवान अविनाश कल्याण आंधळे वय 29 हे कर्तव्यावर असताना हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आज बीड जिल्ह्यातील हिंगणी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शेतकरी कुटुंबातील असलेले जवान अविनाश हे सहा वर्षांपासून देशसेवा बजावत होते.त्यांच्या निधनाची बातमी समजताच हिंगणी गावासह राज्यभर शोककळा पसरली आहे.

जवान अविनाश यांचे पार्थिव आज दुपारी त्यांच्या मुळ गावी हिंगणी येथे दिल्लीहून आणले. त्यांच्या पार्थिवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान अविनाश त्यांचे वडिल शेतकरी आहेत त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp