जानेवारी महिन्यापासून विद्यापीठ विधेयकाला विरोध करत भाजपचं राज्यभर आंदोलन, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई तक

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि पळपुटं सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार किंवा महाविकास आघाडी सरकार आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. विधानसभेत विद्यापीठाच्या कायद्यावर चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक आणि ठरवून तसंच चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेऊन कोणतीही चर्चा न करता हे विधयेक मंजूर करून घेण्याचं पाप सरकारने केलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि पळपुटं सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार किंवा महाविकास आघाडी सरकार आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. विधानसभेत विद्यापीठाच्या कायद्यावर चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक आणि ठरवून तसंच चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेऊन कोणतीही चर्चा न करता हे विधयेक मंजूर करून घेण्याचं पाप सरकारने केलं आहे.

दुर्दैवाने या पापात विधानमंडळाचं सचिवालयही सामील आहे असंही आमच्या लक्षात आलं आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून भाजप आणि भाजयुमो तसंच विधेयक नको असणारे सगळेजण सरकारविरोधात आंदोलन सुरू करतील अशी घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भित्रं सरकार पाहिलेलं नाही’, फडणवीसांची तुफान टोलेबाजी

आम्ही महत्त्वाचे आक्षेप घेतले होते. या राज्य सरकारला विद्यापीठांना आपलं शासकीय महामंडळ बनावायचं आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नवीन विद्यापीठ कायद्याने आत्तापर्यंतच्या कुठल्याही कायद्यात कधीही मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक बाबीत ढवळाढवळ करण्यासाठी कुठलीही तरतूद नव्हती. 2016 चा जो कायदा झाला तो दोन्ही सभागृहाने एकमताने कायदा केला. त्यावेळीही आम्ही विद्यापीठं राजकारणापासून दूर ठेवली मात्र आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत त्यांनी स्वतःला प्रकुलपती म्हणवून घेतलं आहे. या प्र कुलपतींना कुलपतींचे सगळे अधिकार त्यांनी घेतले आहेत असंही फडणवीस यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp