देवेंद्र फडणवीसांमुळेच पूररेषेचा गोंधळ आणि नागरिकांना पुराचा फटका, मेधा पाटकरांचा आरोप

मेधा पाटकर यांचं कोल्हापुरात वक्तव्य
देवेंद्र फडणवीसांमुळेच पूररेषेचा गोंधळ आणि नागरिकांना पुराचा फटका, मेधा पाटकरांचा आरोप

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पूररेषेचा गोंधळ झाला असूनह नागरिकांना पुराचा फटका बसला असा आरोप आता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कोल्हापुरात केला आहे. मेधा पाटकर या सामाजिक कार्यकर्त्या, पर्यावरण अभ्यासक आहेत. त्यांचं नर्मदा बचाव आंदोलन देशभर गाजलं होतं. आता त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या मेधा पाटकर?

'पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजला नाही. त्यामुळे त्यांनी क्रिडाईन पूर रेषेच्या बाबतीत दिलेला अहवाल स्वीकारला. शिवाय निळा आणि लाल रेषेतील बांधकामांना सरसकट सूट दिली. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर जाऊन पर्यावरणासंदर्भात मोठमोठी वक्तव्य करत आहेत..मात्र त्याच वेळी देशात काय परिस्थिती सुरू आहेत याकडे मात्र दुर्लक्ष आहे' असंही मेधा पाटकर म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीसांमुळेच पूररेषेचा गोंधळ आणि नागरिकांना पुराचा फटका, मेधा पाटकरांचा आरोप
Maharashtra@61 : महाराष्ट्राचं राजकारण समाजकारणाशी जोडण्याची गरज-मेधा पाटकर

गेल्या दोन-तीन वर्षांपासून महापूराची तीव्रता वाढली आहे...या सर्वाला पूररेषेच्या बाबतीत बेजबाबदारपणे निर्णय घेणाऱ्या घेणारे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यामुळे किमान आतातरी पूर रेषेची नव्याने आखणी करणे गरजेचे आहे अशी मागणी मेधा पाटकर यांनी केली आहे. नद्यांमधील गाळ आणि वाळू काढून खोलीकरण करणे हे पूर्णता अशास्त्रीय आहे. यातून केवळ ठेकेदारांचे भले होणार आहे.. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार केला गेला पाहिजे अशी अपेक्षा देखील यावेळी मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.

रायगड, चिपळूण, कोल्हापूर आणि सांगली आलेल्या महापुराने भविष्यातील धोक्याचा इशारा दिला आहे. केवळ सरकारच सर्व प्रश्न सोडवेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. आता यामधील अभ्यासकांनी अधिक लक्ष घालून पर्यावरणाची संरचना लक्षात घेऊन नियंत्रणासाठीचे शाश्वत उपाय अंगीकरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असं मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in