महाविकास आघाडीने लोकशाही बंद करून ‘रोक’शाही आणि ‘रोख’शाही सुरू केली-फडणवीस
महाविकास आघाडी सरकार हे रोकशाही म्हणजे प्रत्येक गोष्ट थांबवणारं सरकार आहे. वसुली, खंडणी यांचे विविध प्रकार आणि भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे सरकार आहे अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बुधवारी होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. या सरकारने ‘रोक’शाही म्हणजे प्रत्येक […]
ADVERTISEMENT

महाविकास आघाडी सरकार हे रोकशाही म्हणजे प्रत्येक गोष्ट थांबवणारं सरकार आहे. वसुली, खंडणी यांचे विविध प्रकार आणि भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे सरकार आहे अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बुधवारी होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. या सरकारने ‘रोक’शाही म्हणजे प्रत्येक गोष्ट थांबवायची आणि ‘रोख’शाही म्हणजेच वसुली करायची या पद्धतीने सरकार चालवलं आहे असाही टोला त्यांनी लगावला.
आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न या अधिवेशनात उचलून धरणार आहोत. शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यांच्या वीज तोडण्या या तर सुलतानी पद्धतीने सुरू आहेत एवढंच नाही तर त्यांना आपत्ती येऊनही कोणतीही मदत दिलेली नाही. फक्त विमा कंपन्यांचं भलं करण्याचं काम या सरकारने केलं आहे असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Exclusive: ‘आजही मला त्याचा पश्चाताप होतो…’, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?
भाजपच्या 12 आमदारांना वर्षभर निलंबन कायम ठेवण्याच्या निर्णयाविरोधात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ संसदेचं अधिवेशन इतका काळ अधिवेशन चालू शकतं तर महाराष्ट्राचं का चालत नाही? राज्यात सर्वात कमी वेळ अधिवेशन घेतलं जात आहे. लोकशाही जेवढी कुलुप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.