महाराष्ट्र DGP यांच्याकडून माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनाची शिफारस

मुंबई तक

महाराष्ट्र डीजीपी संजय पांडेय यांनी राज्य सरकारकडे जी शिफारस पाठवली आहे त्यामध्ये परमबीर सिंग यांच्यासमवेत 25 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करावं असं म्हटलं आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि खंडणी वसुलीची काही प्रकरणां आहे. दोन प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्या विरोधात चौकशीही सुरू आहे. डीजीपी संजय पांडेय यांनी पाठवलेल्या प्रस्तावासहीत परमबीर सिंग यांच्यासहीत ज्या पोलीस […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्र डीजीपी संजय पांडेय यांनी राज्य सरकारकडे जी शिफारस पाठवली आहे त्यामध्ये परमबीर सिंग यांच्यासमवेत 25 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करावं असं म्हटलं आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि खंडणी वसुलीची काही प्रकरणां आहे. दोन प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्या विरोधात चौकशीही सुरू आहे.

डीजीपी संजय पांडेय यांनी पाठवलेल्या प्रस्तावासहीत परमबीर सिंग यांच्यासहीत ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत हे अधिकारी डीसीपी, एसीपी या दर्जाचे आहेत. तसंच इतरही काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीजीपींद्वारे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जो सरकारने परत पाठवला आहे आणि ज्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी होते आहे त्यामागचं कारण स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परमबीर सिंग 4 मे 2021 पासून सुट्टीवर आहेत. त्यांनी तब्बेतीचं कारण देऊन सुट्टी घेतली आहे. 29 ऑगस्टपर्यंत त्यांनी दोनवेळा सुट्टी वाढवली आहे. ही सुट्टी त्यांनी का वाढवली आहे याचं कारण त्यांनी अद्याप दिलेलं नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp