बीड: 'रेल्वे कधी येणार, कधी येणार म्हणून पिढ्या गेल्या..' धनंजय मुंडेंनी कोणाला लगावला खोचक टोला?

बीड: 'रेल्वे कधी येणार, कधी येणार म्हणून पिढ्या गेल्या..' धनंजय मुंडेंनी कोणाला लगावला खोचक टोला?
dhananjay munde criticized pankaja munde pritam munde bjp beed railway(फाइल फोटो)

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. 'रेल्वे कधी येणार, कधी येणार म्हणून पिढ्या गेल्या.' असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांनी यावेळी नाव न घेता पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. अंबाजोगाई पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

'सगळी कामं अर्धवट सोडून दिली. जर यांनी ती कामं पूर्ण केली असती तर आम्हाला ती कामं पूर्णत्वास न्यायची जबाबदारी नसती.' असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

'रेल्वे कधी येणार, कधी येणार म्हणून पिढ्या गेल्या. कोव्हिडचं संकट असताना सुद्धा केंद्राचा हिस्सा दोन वर्षात आला नाही. पण मी बीड जिल्ह्यातील मदत थांबू दिली नाही. म्हणून मी अगदी जबाबदारपणे सांगतोय नगरहून आष्टीपर्यंत येत्या 28, 29, 30 डिसेंबर रोजी ट्रायल चालू होणार आहे.'

'मात्र, रेल्वेचं खातं तिकडे केंद्रात आहे. दानवे साहेब आता त्या खात्याचे मंत्री झाले आहेत. खासदार भाजपच्या आहेत. भाजपच्या खासदरकीचा कार्यकाळही बराच मोठा होता.' असा खोचक टोला देखील यावेळी त्यांनी लगावला.

यावेळी धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, आ. संजय भाऊ दौंड, आ. पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

dhananjay munde criticized pankaja munde pritam munde bjp beed railway
पंकजाताई माझी औकात काढत आहात? 2019 चा पराभव विसरलात का?-धनंजय मुंडे

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख us त्यांच्या भाषणात बोलताना म्हणाले की, 'पंचायत समितीची बिल्डिंग बघून सर्वांनाच सीट पकडावी वाटत असेल त्यांनी आताच आपली सीट पकडण्यासाठी रुमाल टाका.'

यावर पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, 'एसटी नाही एसटीचा संप सुरू आहे आणि एसटीमध्ये सीट असतात आपल्या पंचायत समितीचे मध्ये सीट नाहीत अर्धवट राहिलेली कामं आहेत. आम्ही कितीही गर्दीत असलो तरी महाविकास आघाडीचा धर्म पाळत असताना आम्ही उभं राहू तुम्हाला बसवू पण जागा नक्की देऊ.' असं म्हणल्यावर एकच हशा पिकला. दरम्यान, या सगळ्या भाषणात धनंजय मुंडे यांच्या टीकेचा रोख मुंडे भगिनींवरच होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in