विमानतळावर उतरल्यावर लोकांनी रस्त्यावरचे खड्डे बघायचे का?; नारायण राणेंनी ठाकरे सरकारला डिवचलं
चिपी विमनातळावर उतरल्यावर लोकांनी खड्डे बघायचे का? असा प्रश्न विचारत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला डिवचलं आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे आज एकाच मंचावर होते. मात्र या दोघांमधला अबोला कायम होता. या दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केलं. मात्र नारायण राणे जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी तक्रारींचा पाढाच मुख्यमंत्र्यासमोर वाचला. काय म्हणाले नारायण राणे? […]
ADVERTISEMENT

चिपी विमनातळावर उतरल्यावर लोकांनी खड्डे बघायचे का? असा प्रश्न विचारत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला डिवचलं आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे आज एकाच मंचावर होते. मात्र या दोघांमधला अबोला कायम होता. या दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केलं. मात्र नारायण राणे जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी तक्रारींचा पाढाच मुख्यमंत्र्यासमोर वाचला.
काय म्हणाले नारायण राणे?
मी उद्धव ठाकरेंना एक विनंती करू इच्छितो त्यांनी हे फोटो बघावे.. आम्हाला विमानतळ नको हे म्हणणारे आंदोलक होते. 2009 मध्ये हे आंदोलन कुणी केलं? तुम्हाला माहित आहे. महिन्याला कोण जाऊन कोण काम अडवतं? मी नावं घेतली तर राजकारण होईल. रस्त्याच्या विकासकामात कोण अडसर ठरवत होते? विचारा जरा जाऊन तुम्हाला माहिती आहे. आज ते लोक या मंचावर बसले आहेत.
तुम्ही समजता तशी परिस्थिती आज नाही. तेव्हा काही गोष्टी होत्या. सन्मानीय आदित्य ठाकरेंनी इथला अभ्यास करावा, 481 पानांचा रिपोर्ट वाचावा. धरणाला एक रूपया अद्याप दिलेला नाही. काय विकास झाला? या एअरपोर्टलाही पाणी नाही. सबस्टेशन नाही, 34 कोटी नाही. चिपी विमानतळावर उतरल्यावर लोकांनी रस्त्यावरचे खड्डे बघायचे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला. हा देसाई कंपनीचा प्रायव्हेट लिमिटेड कार्यक्रम आहे का? असा प्रश्नही नारायण राणेंनी विचारला.