'बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची...', राज ठाकरेंचा नेमका कोणाला टोला?

मुंबई तक

Raj Thackeray facebook post on Balasaheb Thackeray death anniversary : 'बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची...', राज ठाकरेंचा नेमका कोणाला टोला?

ADVERTISEMENT

Raj Thackeray facebook post on Balasaheb Thackeray death anniversary
Raj Thackeray facebook post on Balasaheb Thackeray death anniversary
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची...',

point

राज ठाकरेंचा नेमका कोणाला टोला?

Raj Thackeray facebook post on Balasaheb Thackeray death anniversary : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.17) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यातून त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं असून बाळासाहेबांच्या विचारांबाबत सविस्तरपणे भाष्य केलंय. राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय? जाणून घेऊयात..

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी

शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.

हेही वाचा : राज्यात गेल्या 9 महिन्यांत 11532 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू; समृद्धी महामार्गाची आकडेवारी चिंतेत टाकणारी

पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही !

हे वाचलं का?

    follow whatsapp