ताडी पिऊन दोन तरुणांचा मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

ताडी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरु
ताडी पिऊन दोन तरुणांचा मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: ताडीचे अतिसेवन केल्याने दोन तरुणांचा मृत्य झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील कोपर परिसरात घडली आहे. सचिन पाडमुख (22) व स्वप्नील चोळके (30) अशी दोन मयत तरुणांची नाव आहेत. स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता. मात्र दोन महिन्यापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुट्टीवर होता.

दोन तरुणांनी जीव गमावल्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणी ताडी विक्रेता रवी भथणीच्या विरोधात गुन्हा दाखल करून याचा शोध सुरू केला आहे.

डोंबिवली पश्चिम कोपर परिसरात राहणारे सचिन पाडमुख व स्वप्नील चोळके हे दोघे काल सायंकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटर वर ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख व स्वप्नील चोळके घरी परतत असताना रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला. त्याच्या दोन मित्रांनी दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वी या दोघांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी ताडी विक्रेता रवी भथणीचा विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. आरोपीचे मूळगाव तेलंगणा आहे. त्यामुळे तिकेडही एक पथक रवाना झाल्याचं समजतं आहे.

दरम्यान, या दोघांचा मृत्यू ताडीचे अतिसेवन केल्याने झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालेराव यांनी सांगितले.

मयत सचिन पाडमुख कैलास नगर मुक्ताई निवासमध्ये राहत असून एका कंपनीत नोकरी करत होता. त्याचा पश्चात आई-वडील, भाऊ बहीण असा परिवार आहे. मयत सचिनच्या कुटुंबीयांनी संबंधित ताडी विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच मयत स्वप्नील चोळके हा कोपर गावात राहात असून डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता. मात्र दोन महिन्याअसून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुट्टीवर होता. त्याचा पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण, बायको आणि 5 वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in