त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथांची वारी रद्द, वारकर्‍यांमध्ये नाराजी

Wari of Sant Nivruttinath at Trimbakeshwar cancelled: त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथांची वारी यंदा कोरोना संकटामुळे पुन्हा रद्द करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथांची वारी रद्द, वारकर्‍यांमध्ये नाराजी
due to corona covid 19 wari of sant nivruttinath at trimbakeshwar cancelled displeasure among warkari(फोटो सौजन्य: trimbakeshwartrust)

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर येथे जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात होणारी संत निवृत्तिनाथांची पौष वारी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वारकर्‍यांमध्ये नाराजी आहे. गतवर्षीही कोरोनामुळे संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण राज्यभरात वाढू लागले आहेत. त्यामुळे त्र्यंबक उपविभागीय अधिकार्‍यांनी पौष वारीसाठी नियमावली जाहीर केली आहे.

श्री. संत निवृत्तिनाथ यात्रा दरवर्षी पौष वद्य एकादशीला भरत असते. यावर्षी 25 ते 29 जानेवारी रोजी पौष वारी आहे. या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून किमान पाच लाख वारकरी, भाविक त्र्यंबकेश्वर येथे येतात. तर जवळपास 500 च्या आसपास पायी दिंड्या येत असतात.

काही दिंड्यांना शेकडो वर्षांची परंपराही आहे. पण यावेळी मात्र कोरोनामुळे ही पौषवारी रद्द करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी यांसदर्भात नियमावलीही जाहीर केली आहे.

अशी आहे नियमावली

-त्र्यंबकेश्वरकडे जाण्यास पायी दिंडयांना जाण्यास परवानगी नसेल.

- त्र्यंबकेश्वर शहरात व परिसरात यात्रा भरवता येणार नाही.

- मंदिरात पूजाविधीसाठी 50 पुजारी, सेवेकऱ्यांना उपस्थितीस परवानगी.

- रथोत्सवात केवळ 50 व्यक्तींचीच उपस्थिती

- रथोत्सवात सहभागी होणार्‍यांना लस घेणे बंधनकारक आहे.

- कार्यक्रमादरम्यान कोणत्याही प्रकारची वाद्य वाजवण्यास मनाई.

- श्री निवृत्तीनाथ समाधी मंदिरात 50 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पौष वारी रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी होणारे पूजाविधीसाठी परवानगी देण्यात आली आहे. वारीसाठी पायी दिडयांना परवानगी नाही. वारी मार्गावर कोणतीही दुकाने, स्टॉल्स, मनोरंजनाची साधने लावण्यास परवानगी राहणार नाही.

यात्रोत्सवाच्या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेतच कार्यक्रम करावे लागणार आहेत. 28 जानेवारीच्या रथोत्सवास परवानगी देण्यात आली असून रथोत्सवासाठी 50 पेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. शासनाचे सर्व नियम पाळून वारी केली जाईल. अशी माहिती प्रशासक अ‍ॅड. भाऊसाहेब गंभीरे यांनी दिली आहे.

due to corona covid 19 wari of sant nivruttinath at trimbakeshwar cancelled displeasure among warkari
Corona चं संकट! आषाढी वारी यंदाही निर्बंधांमध्येच पार पडणार

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दिवसभरात 18 हजार 466 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 20 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.1 टक्के झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 4 हजार 558 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण 65 लाख 18 हजार 916 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातले रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.86 टक्के झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 95 लाख 9 हजार 260 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 67 लाख 30 हजार 494 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 98 हजार 391 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 110 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Related Stories

No stories found.