नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात, ईडीने दाखल केली चार्जशीट
सध्या बिनखात्याचे मंत्री असलेले नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. दाऊदच्या बहिणीशी म्हणजेच हसीना पारकरशी जमिनीसंदर्भातला व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा अद्याप मिळालेला नाही. अशातच त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ईडीने त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवाब मलिक मुसलमान आहेत म्हणून…. काय म्हणाले शरद […]
ADVERTISEMENT

सध्या बिनखात्याचे मंत्री असलेले नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. दाऊदच्या बहिणीशी म्हणजेच हसीना पारकरशी जमिनीसंदर्भातला व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा अद्याप मिळालेला नाही. अशातच त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ईडीने त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
नवाब मलिक मुसलमान आहेत म्हणून…. काय म्हणाले शरद पवार?
ईडीने मनी लाँड्रींग प्रकरणात नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारीला अटक केली होती. गेल्या ५८ दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. २२ एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज ईडीने त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. त्यामुळे अर्थातच नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.
क्रोनोलॉजी समझिये… पाहा आर्यन खानसाठी पुढे सरसावलेले नवाब मलिक कसे सापडले ईडीच्या जाळ्यात!