अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेशच्या अटकपूर्व जामिनाला ED चा विरोध

विद्या

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ED च्या कोठडीत आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेशच्या अटकपूर्व जामिनाला ईडीने विरोध केला आहे. ईडीने याप्रकरणी कोर्टात आपला अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणातील सर्व घडामोडींचा विचार केला असता, ऋषिकेशला जामिन देता येणार नाही. ऋषिकेशला जामिन मिळाल्यास तो चौकशीसाठी हजर न राहण्याची शक्यता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ED च्या कोठडीत आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेशच्या अटकपूर्व जामिनाला ईडीने विरोध केला आहे. ईडीने याप्रकरणी कोर्टात आपला अर्ज दाखल केला आहे.

या प्रकरणातील सर्व घडामोडींचा विचार केला असता, ऋषिकेशला जामिन देता येणार नाही. ऋषिकेशला जामिन मिळाल्यास तो चौकशीसाठी हजर न राहण्याची शक्यता आहे. ऋषिकेश हा प्रभावशाली व्यक्ती असून त्याने केलेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सध्या प्राथमिक स्वरुपात आहे. त्यामुळे ऋषिकेश तपासात अडथळे आणून साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचं ईडीने आपल्या रिप्लायमध्ये म्हटलं आहे.

ईडीतर्फे तपास अधिकारी तसिन सुलतान यांनी वकील श्रीराम शिरसाठ यांच्यामार्फत कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे.

“परमबीर सिंह भारतातच; त्यांच्या जीवाला मुंबईत धोका”; सर्वोच्च न्यायालयात मिळाला मोठा दिलासा

हे वाचलं का?

    follow whatsapp