National Herald Case : यंग इंडियाचं कार्यालय ईडीकडून सील, काँग्रेस आक्रमक
नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई ईडीने केली आहे. ईडीने यंग इंडियाचं कार्यालय सील केलं आहे. मंगळवारी ईडीने या कार्यालयाची झडती घेतली होती. त्यानंतर आता हे कार्यालय सील करण्यात आलं आहे. यंग इंडिया कंपनीचे ३८ टक्के शेअर्स सोनिया गांधी यांच्याकडे आहेत. तेवढेच राहुल गांधी यांच्याकडे आहेत. यंग इंडिया ही तीच कंपनी जी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच […]
ADVERTISEMENT

नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई ईडीने केली आहे. ईडीने यंग इंडियाचं कार्यालय सील केलं आहे. मंगळवारी ईडीने या कार्यालयाची झडती घेतली होती. त्यानंतर आता हे कार्यालय सील करण्यात आलं आहे. यंग इंडिया कंपनीचे ३८ टक्के शेअर्स सोनिया गांधी यांच्याकडे आहेत. तेवढेच राहुल गांधी यांच्याकडे आहेत. यंग इंडिया ही तीच कंपनी जी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच एजेएलने टेकओव्हर केली होती.
नॅशनल हेराल्डशी संबंधित हेराल्ड हाऊससह १२ ठिकाणी ईडीचे छापे
नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी ईडीने हेराल्ड हाऊससह १२ ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, सोनिया गांधी यांना ईडीने प्रश्न विचारला होता की, एजेएलच्या अधिग्रहणात ९० कोटी रुपयांच्या कर्जाचा उल्लेख का नाही? तसेच डोटेक्स कंपनीने दिलेले १ कोटी रुपयांचे कर्ज कोणत्या स्वरूपात घेण्यात आले होते. या प्रश्नाला उत्तर देताना सोनिया गांधी यांनी सांगितलं होतं की, या सर्व गोष्टींची माहिती त्यांना नसून मोतीलाल व्होरा यांना आहे.
डोटेक्स कंपनीने यंग इंडियाला दिलेले एक कोटी रुपयांचे कर्ज मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून दिल्याचा ईडीला संशय आहे. अधिग्रहणात यंग इंडिया कंपनीला एजेएलचे 9 कोटींचे शेअर्स मिळाले. तर सोनिया आणि राहुल गांधी म्हणाले की, मोतीलाल व्होरा हे पैशाच्या व्यवहाराचे संपूर्ण प्रकरण पाहायचे. यंग इंडियाचे 4 शेअरहोल्डर्स सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस होते. यामध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांची कंपनीत 76 टक्के भागीदारी होती.
नॅशनल हेराल्डचं प्रकरण काय?
मार्च २००८ पर्यंत हे वृत्तपत्र सुरूवातीला देशातील स्वातंत्र्य लढ्याशी आणि त्यानंतर काँग्रेसशी संलग्न होते. १ एप्रिल २००८ मध्ये वृत्तपत्र बंद ठेवण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. हे वृत्तपत्र बंद करण्याच्या आधी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) कडून चालवलं जात होतं.