कारवाईचा फास आवळला जाणार? ED नंदकिशोर चतुर्वेदीविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट काढण्याच्या तयारीत

दिव्येश सिंह

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्याविरुद्ध ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पाटणकर यांच्या नावावर असलेले ११ फ्लॅट ईडीने सील केले आहेत. या चौकशीदरम्यान पाटणकर यांच्या फर्म्सना नंदकिशोर चतुर्वेदी या हवाला ऑपरेटरकडून Unsecure Loan मिळाल्याचं ईडीला समजलं आहे. त्यामुळे चतुर्वेदीविरुद्ध ईडीने कारवाईचा फास आवळण्याचं ठरवलं आहे. ईडी येणाऱ्या काही दिवसांत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्याविरुद्ध ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पाटणकर यांच्या नावावर असलेले ११ फ्लॅट ईडीने सील केले आहेत. या चौकशीदरम्यान पाटणकर यांच्या फर्म्सना नंदकिशोर चतुर्वेदी या हवाला ऑपरेटरकडून Unsecure Loan मिळाल्याचं ईडीला समजलं आहे. त्यामुळे चतुर्वेदीविरुद्ध ईडीने कारवाईचा फास आवळण्याचं ठरवलं आहे. ईडी येणाऱ्या काही दिवसांत चतुर्वेदीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जाहीर करण्यासाठी पावलं उचलणार असल्याचं कळतंय.

नंदकिशोर चतुर्वेदी हा देशातला सर्वात मोठा हवाला ऑपरेटर म्हणून ओळखला जातो. देशातल्या अनेक राजकीय नेत्यांशी याचे जवळचे संबंध असल्याचंही बोललं जातं. अनेक प्रकरणांमध्ये चतुर्वेदी हा ईडीसह अन्य यंत्रणांच्या रडारवर आहे. परंतू अनेकदा प्रयत्न करुनही तो त्यांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान ईडीने येणाऱ्या काही दिवसांमध्ये श्रीधर पाटणकर यांच्या आणखी काही मालमत्ता जप्त करण्याची तयारी केल्याचं कळतंय. येणाऱ्या काळात पाटणकर यांना ईडी चौकशीसाठी बोलावू शकतं, या चौकशीनंतर पुढील कारवाईचा मार्ग स्पष्ट होणार असल्याची माहिती ईडीमधील सूत्रांनी दिली.

ईडीने २०१७ साली पुष्पक बुलियन प्रकरणात एक कारवाई केली होती. त्यात चंदू पटेल आणि आणखी एका व्यक्तीला अटक झाली होती. या कारवाईत ईडीला एक गोष्ट समजून आली ती म्हणजे नोटबंदीच्या काळात या आरोपींनी जुन्या नोटा देऊन सोनं खरेदी केली. या व्यवहारातून मिळालेले २० कोटी रुपये आरोपींनी चतुर्वेदीच्या माध्यमातून फिरवले. चतुर्वेदीची एक बोगस कंपनी हमसफर प्रायव्हेट लिमीटेड ने, श्री साईबाबा गृहनिर्माण कंपनीत हे पैसे ट्रान्सफर केले. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, साईबाबा कंपनीत श्रीधर पाटणकर यांची कंपनी आहे. यामुळेच ईडीने पाटणकर यांच्या नावावकर असलेले ११ फ्लॅट सील केले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यांना अडचणीत आणणारे नंदकिशोर चतुर्वेदी आहेत तरी कोण? जाणून घ्या…

हे वाचलं का?

    follow whatsapp