Twitter युजर्सना मोजावे लागणार पैसे, एलॉन मस्क यांनी केली मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) हे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी खरेदी केलं आहे. या डीलनंतर एलॉन मस्क यांची जगभरात चर्चा होते आहे. अशात त्यांनी हे संकेत दिले आहेत की लवकरच ट्विटर युजर्सना पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटरचा वापर सध्या मोफत आहे. मात्र लवकरच ते वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे संकेत एलॉन मस्क यांनी दिले आहेत.

“एलॉन मस्क यांनी हे देखील सांगितलं आहे कॅज्युअल युजर्ससाठी Twitter कायमच मोफत असेल मात्र सरकारी आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत”

एलॉन मस्क

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एलॉन मस्क यांनी हे देखील सांगितलं आहे कॅज्युअल युजर्ससाठी Twitter कायमच मोफत असेल मात्र सरकारी आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. एलॉन मस्क यांनी मंगळवारी न्यूयॉर्कच्या मेट गालामध्येही उपस्थिती लावली होती. ट्विटरच्या यशाचं पुढचं पाऊल हे आहे की युजर्ससाठी आम्ही आणखी ट्विटरचा विस्तार करतो आहोत. अमेरिकेतला एक मोठा हिस्सा ट्विटरवर असला पाहिजे आणि त्यांनी संवादात सहभागी झालं पाहिजे अशीही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.

एलॉन मस्कना मिळाला नवा CEO? पराग अग्रवाल, विजया गाड्डेंना दाखवणार घरचा रस्ता?

ADVERTISEMENT

ट्विटरच्या एका अहवालानुसार अमेरिकेत ट्विटरचे ४ कोटी रोजचे अॅक्टिव्ह युजर्स आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विटर ४४ अरब डॉलर्समध्ये डील केली आहे. त्यानंतर आलेल्या अनेक रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे की एलॉन मस्क आता ट्विटरमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत. यानंतर या बातम्याही येत आहेत की कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेट विजया गाड्डे यांनाही घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

ADVERTISEMENT

ट्विटरची डील झाल्यानंतर एलन मस्क काय म्हणाले होते?

“अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हा सक्रीय लोकशाहीचा आधार आहे आणि ट्विटर डिजिटल जगातील एक टाऊन स्क्वेअर आहे. जिथे मानवतेच्या भविष्याबद्दल महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होते. नवीन सुविधांसह मला ट्विटरला अधिक चांगलं बनवायचं आहे. ट्विटरवरील लोकांचा विश्वास वाढावा म्हणून एल्गोरिदमला ओपन सोर्स बनवायचं आहे. स्पॅम बॉट्स हटवायचं आणि सर्व लोकांना प्रामाणित करणं यामध्ये असेल.”

“ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता आहे. मी ट्विटरला बंधमुक्त करण्यासाठी कंपनी आणि यूजर्सच्या कम्युनिटीसोबत काम करण्यास उत्सुक आहे,” असं एलन मस्क यांनी म्हटलं होतं. त्यांचं हे ट्विट चर्चेत आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT