वाढत्या कोरोना रुग्णामुळे DGCA ची मास्क घालण्याबाबत नवीन गाईडलाईन; पालन न केल्यास कारवाई

दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतर DGCA ने प्रवाशांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे.
Aviation regulator as Covid cases spike
Aviation regulator as Covid cases spike

दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतर DGCA ने प्रवाशांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यानुसार, कोविडची वाढती प्रकरणे पाहता प्रवाशांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे आणि विमानात मास्क घालणे आवश्यक आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राजधानी दिल्लीची स्थिती सर्वात वाईट आहे. गेल्या काही दिवसांत दिल्लीत दररोज 2 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. तर सरासरी 8 ते 10 लोकांचा मृत्यू होत आहे.

मास्क घालण्याचे आवाहन

मागील काही दिवसांपासून दिल्लीत दररोज 2 हजार पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, मंगळवारी 1000 हून कमी नवीन रुग्ण आढळून आले ही दिलासादायक बाब आहे. तरीसुद्धा, आरोग्य विभागाने लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारनेही कोरोना प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे.

DGCA नवीन मार्गदर्शक तत्त्वे

राज्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येनंतर DGCA ने प्रवाशांसाठी एक नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. आता प्रवाशांना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. तसेच, विमानात मास्क घालणे आवश्यक असेल. कोणत्याही प्रवाशाने सूचनांचे पालन केले नाही, तर विमान कंपनी त्याच्यावर कठोर कारवाई करेल," असे डीजीसीएने म्हटले आहे.

रुग्णांचे गंभीर होण्याचे प्रमाण वाढले

दिल्ली स्टेट हेल्थ बुलेटिनने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार 1 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रुग्णालयातील 307 कोविड रुग्णांपैकी ही संख्या 588 वर पोहोचली आहे, तर 205 ऑक्सिजन सपोर्टवर आणि 22 व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. ICU प्रवेश 1 ऑगस्ट रोजी 98 वरून 16 ऑगस्ट पर्यंत 202 पर्यंत वाढले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in