फेसबुक, इन्स्टाग्रामचं चाललंय काय?; आठवडाभरात दुसऱ्यांदा डाउन
फेसबुकसह व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर डाउन झाल्यानं जगभरातील ‘सोशल’ जनजीवन ठप्प झालं होतं. त्याबद्दलच्या कारणांचा खुलासा करत फेसुबकने माफीही मागितली होती. मात्र, आठवडाभराच्या आतच दुसऱ्यांदा फेसुबक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर डाउन झालं होतं. दुसऱ्यांदा झालेल्या या प्रकाराबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. (Facebook-Instagram Down secondly in a week) फेसबुक, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर सोमवारी (5 ऑक्टोबर) रात्रभर […]
ADVERTISEMENT

फेसबुकसह व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर डाउन झाल्यानं जगभरातील ‘सोशल’ जनजीवन ठप्प झालं होतं. त्याबद्दलच्या कारणांचा खुलासा करत फेसुबकने माफीही मागितली होती. मात्र, आठवडाभराच्या आतच दुसऱ्यांदा फेसुबक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर डाउन झालं होतं. दुसऱ्यांदा झालेल्या या प्रकाराबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. (Facebook-Instagram Down secondly in a week)
फेसबुक, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर सोमवारी (5 ऑक्टोबर) रात्रभर डाउन झाल्यानं सोशल मीडियावरील संदेश यंत्रणा ठप्प झाली होती. सोमवारी झालेल्या या प्रकारानंतर असंच शुक्रवारीही झालं. शुक्रवारी पुन्हा एकदा फेसबुक, इन्स्टाग्राम, मेंसेजर या सेवा डाउन झाल्या होत्या.
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर अॅप व सेवेचा वापर करणाऱ्या यूजर्सना फोटो अपलोडपासून मेसेजिंगपर्यंत अडचणींना तोंड द्यावं लागलं. फेसबुक इंकने याला दुजोरा दिला आहे. सोशल मीडियातील महत्त्वाची कंपनी असलेल्या फेसबुकच्या सेवेत डेटा सेंटरच्या नियमित कामादरम्यान खंड पडला होता. यामुळे यूजर्संना पुन्हा सहा तास सेवेपासून वंचित राहावं लागलं.
हुश्श… ‘सोशल’ जीवन पूर्वपदावर! 6 तासांनंतर व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकची सेवा पूर्ववत