देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाचा दुरुपयोग केला, नाना पटोलेंची टीका
चंद्रपूर: ‘अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वापर हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फक्त अंबानींच्या वकिलीसाठी केला. या एकाच मुद्द्यावर ते सतत बोलत राहिले. त्याशिवाय कोणत्याही महत्त्वाचे मुद्द्यावर त्यांनी चर्चा केली नाही.’ असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस हे सर्व काही अंबानींच्या घरावर हेलिपॅड तयार करण्यासाठी आणि त्यांचा […]
ADVERTISEMENT

चंद्रपूर: ‘अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वापर हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फक्त अंबानींच्या वकिलीसाठी केला. या एकाच मुद्द्यावर ते सतत बोलत राहिले. त्याशिवाय कोणत्याही महत्त्वाचे मुद्द्यावर त्यांनी चर्चा केली नाही.’ असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस हे सर्व काही अंबानींच्या घरावर हेलिपॅड तयार करण्यासाठी आणि त्यांचा परिवाराला झेड प्लस सुरक्षा मिळावी यासाठी करत आहेत. असाही आरोप पटोलेंनी केला.
सध्या देशात ज्या तीन कृषी कायद्याचा शेतकरी विरोध करत आहेत त्यामध्ये अंबानी परिवाराला सहानुभूती मिळावी यासाठी विरोधी पक्षांनी विधानसभेत गदारोळ केला. त्यामुळे ही घटना संविधानविरोधी आहे. असा आरोप देखील नानाभाऊ पटोले यांनी केला आहे.
‘फडणवीसांनी या अधिवेशनाचा वापर मुकेश अंबानींच्या वकिलीसाठी केला’