पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतरही शेतकरी आंदोलन सुरूच राहणार; राकेश टिकैत यांनी मांडली भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली आहे. तसंच आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी आता घरी जावं असंही आवाहन मोदींनी केलं आहे. आज सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ही मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलं असलं तरीही शेतकरी आंदोलन तातडीने […]
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली आहे. तसंच आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांनी आता घरी जावं असंही आवाहन मोदींनी केलं आहे. आज सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ही मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलं असलं तरीही शेतकरी आंदोलन तातडीने मागे घेतलं जाणार नाही असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केलं आहे. कृषी कायदे जोपर्यंत संसदेत रद्द होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. तसंच MSP आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारने आमच्याशी चर्चा करावी.
आंदोलन तत्काल वापस नहीं होगा, हम उस दिन का इंतजार करेंगे जब कृषि कानूनों को संसद में रद्द किया जाएगा ।
सरकार MSP के साथ-साथ किसानों के दूसरे मुद्दों पर भी बातचीत करें : @RakeshTikaitBKU#FarmersProtest
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) November 19, 2021
काय म्हणाले पंतप्रधान मोदी…