Bus Accident: शिर्डीला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, 10 साईभक्तांचा मृत्यू - Mumbai Tak - fatal accident of bus going from ulhasnagar to shirdi as many as 10 sai devotees unfortunately died - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

Bus Accident: शिर्डीला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, 10 साईभक्तांचा मृत्यू

प्रविण ठाकरे, नाशिक Shirdi Accident: सिन्नर: अंबरनाथहून (Ambernath) शिर्डीला (Shirdi) साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनासाठी चाललेल्या एका भाविकांच्या बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला ज्यामध्ये तब्बल 10 साई भक्तांचा जागीच मृत्यू (10 Sai devotees died) झाल्याची धक्कादायक घटना सिन्नर (Sinner) शिर्डी रोडवरील पाथरे गावाजवळ घडली आहे. खासगी लक्झरी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली ज्यामध्ये बसचा […]

प्रविण ठाकरे, नाशिक

Shirdi Accident: सिन्नर: अंबरनाथहून (Ambernath) शिर्डीला (Shirdi) साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनासाठी चाललेल्या एका भाविकांच्या बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला ज्यामध्ये तब्बल 10 साई भक्तांचा जागीच मृत्यू (10 Sai devotees died) झाल्याची धक्कादायक घटना सिन्नर (Sinner) शिर्डी रोडवरील पाथरे गावाजवळ घडली आहे. खासगी लक्झरी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली ज्यामध्ये बसचा अक्षरश: चुराडा झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात दहा जणांचा मृत्यू झाला. (fatal accident of bus going from ambernath to shirdi as many as 10 Sai devotees unfortunately died)

पाथरे येथील ईशानेश्वर मंदिराजवळ बसचा हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 6 महिला, 2 पुरुष आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. तर 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अंबरनाथ येथील लक्ष्मीनारायण पॅकेजिंग कंपनी तर्फे त्यांचे कामगार व कुटुंबीयांना एकूण पंधरा बसेस द्वारे दर्शनाला जात असल्याचे समजते. त्यापैकी अपघात झालेली ही बस पाचव्या क्रमांकाची आहे असे समजते.

दुर्घटनांची मालिका… २ महिन्यात ५ आमदारांचे अपघात!

मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस क्रमांक MH-04-SK-2751 आणि शिर्डी बाजूकडून सिन्नरकडे जाणारा माल ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन हा आपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरहून साई दर्शनासाठी निघालेल्या 15 बसपैकी ही एक बस होती. ही बस गुरुवारी रात्री शिर्डीसाठी निघाली होती. पण शुक्रवारी पहाटेच्या सुमारा साई भक्तांच्या या बसला भीषण अपघात झाला. ज्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. तर बसमधील बहुतांश प्रवासी हे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बसमध्ये सुमारे 50 लोक होते.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं. त्यानंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

खड्डा, वेग, डुलकी… ऋषभ पंतचा अपघात कशामुळे? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी-नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

राघव-परिणीतीच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता…