थेट मुळावरचं घाव! 130 जणांच्या मृत्यूचं कारण ठरलेलं मैदान होणार जमिनदोस्त

Indonesia soccer stampede नंतर अवघ्या १५ दिवसांतच मोठा निर्णय घेतल्यानं सोशल मिडियावर राष्ट्राध्यक्षांच्या कृतीचं कौतुक होऊ लागलं आहे.
violence at football match in Indonesia
violence at football match in IndonesiaRFI.FR

Indonesia soccer stampede

इंडोनेशिया : तब्बल 130 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेलं फुटबॉलचं कंजुरुहान स्टेडियम पाडण्याचा आणि पुन्हा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे अर्थात फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांच्यासोबत पाड पडलेल्या बैठकीनंतर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी याबाबत माहिती दिली. अवघ्या 15 दिवसांमध्येच हा निर्णय घेतल्यानं सोशल मिडीयावर राष्ट्रवाध्यक्षांचं कौतुक होऊ लागलं आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.

काय झालं होतं इंडोनेशियामध्ये?

2 ऑक्टोबर रोजी इंडोनेशियामधील कंजुरुहान स्टेडियममधील फुटबॉल सामन्यात संघ पराभूत झाल्याने हताश होऊन समर्थकांनी मैदानावर घातलेल्या गोंधळामुळे मोठा हिंसाचार झाला होता. पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात तब्बल 130 जणांचा मृत्यू झाला होता. यात 34 जणांचा मैदानात तर उर्वरीत 96 जणांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. याशिवाय हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये 200 हुन अधिक जण जखमी झाले होते.

इंडोनेशियामधील पूर्व जावाच्या मलंग भागातील कंजुरुहान स्टेडियममध्ये अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात फुटबॉल सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान अरेमाचा संघ पराभूत झाला. त्यानंतर अरेमाच्या हताश समर्थकांनी मैदानावरच गोंधळास सुरुवात केली. या गोंधळातच प्रेक्षकांची धावाधाव आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली आणि मोठा हिंसाचार उसळला होता.

दुर्घटनेवेळी स्टेडियममधील चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलीस पुढे आले. मात्र, त्यांनाही ते थांबवता आले नाही. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. स्टेडियममधील गोंधळ काही वेळात थांबला, पण संतप्त लोक रस्त्यावर आले, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये लोकांनी सीमा ओलांडून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर आता थेट या मैदानाचा कायपालटं करण्याचा निर्णय घेण्यात आलं समोर आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in