पटेलांची पार्टी आठवली, सचिन वाझेंची पार्टी कोणती आहे?

मुंबई तक

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातले अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात उत्तर दिलं. सभागृहासमोर आपलं निवेदन वाचून दाखवत असताना अनिल देशमुख यांनी खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा दाखला देऊन विरोधी पक्षांना टोला लगावला. प्रशासक म्हणून काम करणारे प्रफुल पटेल हे भाजप सरकारमधले मंत्री होते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातले अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात उत्तर दिलं. सभागृहासमोर आपलं निवेदन वाचून दाखवत असताना अनिल देशमुख यांनी खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा दाखला देऊन विरोधी पक्षांना टोला लगावला. प्रशासक म्हणून काम करणारे प्रफुल पटेल हे भाजप सरकारमधले मंत्री होते आणि त्यांच्याकडून डेलकर यांना त्रास होत होता असं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली. ज्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी…सचिन वाझेंची पार्टी कोणती आहे असा विचारत सरकार वाझे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.

मनसुख हिरेन मृत्यू: सचिन वाझेंना तात्काळ अटक करा – देवेंद्र फडणवीस

“प्रफुल पटेल जे प्रशासक आहेत त्याची पार्टी तुम्हाला आठवली, मग सचिन वाझेंची पार्टी कोणती आहे?? २००८ साली त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला होता? धनंजय गावडेची पार्टी कोणती आहे, कोणत्या पक्षाचे ते उपाध्यक्ष आहेत…सचिन वाझे आजही Crime Intelligence Unit मध्ये काम करतायत आणि त्यांची चौकशी होऊ शकते. सरकारने सचिन वाझेंना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे. सरकार सचिन वाझेंना पुरावे नष्ट करण्याची मुभा देतंय. तुमचा खरा चेहरा आज दिसतोय. इतके पुरावे समोर असतानाही त्यांनी केवळ एका पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय”, असं म्हणत फडणवीसांनी अनिल देशमुखांना प्रत्युत्तर दिलं.

“अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ चार महिने सचिन वाझेंकडे”

हे वाचलं का?

    follow whatsapp