जुळून आल्या रेशीमगाठी ! समाजाची बंधनं झुगारत नागपूरच्या तरुणींचा लग्नाचा निर्णय
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी समलैंगिक संबंध हा विषय भारतासारख्या रुढी परंपरांचा पगडा असलेल्या देशात अजुनही खुलेपणाने चर्चेला घेतला जात नाही. परंतू काही वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासीक निर्णय देताना देशात समलैंगिक संबंधांना मान्यता दिल्यानंतर देशात अनेक महत्वाचे बदल होत आहे. LGBTQ समुदायातील लोकं खुलेपणाने समोर येऊन आपली मत मांडायला लागली असून त्यांच्या प्रश्नाकडे बघण्याच्या दृष्टीकोनातही […]
ADVERTISEMENT

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
समलैंगिक संबंध हा विषय भारतासारख्या रुढी परंपरांचा पगडा असलेल्या देशात अजुनही खुलेपणाने चर्चेला घेतला जात नाही. परंतू काही वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासीक निर्णय देताना देशात समलैंगिक संबंधांना मान्यता दिल्यानंतर देशात अनेक महत्वाचे बदल होत आहे. LGBTQ समुदायातील लोकं खुलेपणाने समोर येऊन आपली मत मांडायला लागली असून त्यांच्या प्रश्नाकडे बघण्याच्या दृष्टीकोनातही हळुहळु बदल होताना दिसतो आहे. महाराष्ट्राची उप-राजधानी नागपूरमध्ये असाच एक आश्वासक बदल घडला असून, शहरातल्या दोन महिलांनी आपलं प्रेम पुढे घेऊन जात विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर शहरातलं हे पहिलं समलैंगिक लग्न ठरणार असून डॉ. सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी या जोडप्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच परिवाराच्या उपस्थितीत या दोघींचाही साक्षगंध सोहळा पार पडला.











