माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत वाढ, बॉम्बे हायकोर्टाकडून दिलासा नाही
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बॉम्बे हायकोर्टाने दिलासा दिलेला नाही. शुक्रवारी त्यांची ईडी कोठडी संपत असतानाच यामध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली. आता यानंतर अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत सोमवारपर्यंत म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. याआधी ईडीने मागितलेली कोठडी सत्र न्यायालयाने फेटाळत त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा […]
ADVERTISEMENT

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बॉम्बे हायकोर्टाने दिलासा दिलेला नाही. शुक्रवारी त्यांची ईडी कोठडी संपत असतानाच यामध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली. आता यानंतर अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत सोमवारपर्यंत म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. याआधी ईडीने मागितलेली कोठडी सत्र न्यायालयाने फेटाळत त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा निर्णय फेटाळून लावत त्यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आता त्यामध्ये तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर शनिवारी (6 नोव्हेंबर 2021) पुन्हा कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता त्यांच्या कोठडीत 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
100 कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून समोर आलेले नव्हते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे.