माजी शिवसेना नगरसवेकाची KDMC सहायक आयुक्त राजेश सावंत यांना मारहाण
कल्याणच्या मोहने येथील मंदिराच्या बांधकामावर कारवाई दरम्यान केडीएमसी सहाय्यक आयुक्ताना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी अ प्रभाग कार्यालयाबाहेर घडली आहे. याप्रकरणी मारहाण आणि सरकारी कर्मचारी यांच्या कामात अडथळा निर्माण करणे या कलमन्वय खडकपाडा पोलीस ठाण्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक मुकुंद कोट व मनसेच्या माजी नगरसेविका सुनंदा कोट यांच्यासह 15 से 20 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला […]
ADVERTISEMENT

कल्याणच्या मोहने येथील मंदिराच्या बांधकामावर कारवाई दरम्यान केडीएमसी सहाय्यक आयुक्ताना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी अ प्रभाग कार्यालयाबाहेर घडली आहे. याप्रकरणी मारहाण आणि सरकारी कर्मचारी यांच्या कामात अडथळा निर्माण करणे या कलमन्वय खडकपाडा पोलीस ठाण्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक मुकुंद कोट व मनसेच्या माजी नगरसेविका सुनंदा कोट यांच्यासह 15 से 20 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणच्या मोहने गावात गावदेवीचे जुने मंदिर होते. मात्र ते मंदिर मोडकळीस आले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी ते मंदिर तोडून त्या ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यासाठी पाया रचला होता. परंतु कोणीतरी बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याची तक्रार महापालिकेच्या “अ” विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांच्या कडे केली होती. त्यानुसार आज दुपारी 12 वाजता सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी त्यांच्या पथकासह जाऊन जेसीबीच्या सहाय्याने सदर मंदिराचा पाया तोडला. यामुळे नागरिक चिडले आणि त्यांनी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली.
सत्तेचं असंही समीकरण, भाजप आमदार म्हणाले, भूलथापांना बळी न पडता NCP पॅनलला मत द्या !
शहरातील इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नाही आणि आमच्या मंदिरावर कारवाई का होते असा प्रश्न विचारत पालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. यावेळी माजी नगरसेवक कोट यांनी सहायक आयुक्त सावंत यांच्या कानशिलात लगावली. ज्यानंतर मुकुंद कोट आणि माजी नगरसेविका सुनंदा कोट यांच्यासह १५ ते २० जणांवर खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झालवा आहे.