भिवंडी: कोरोनावरील दुसरी लस घेतल्यानंतर 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / भिवंडी: कोरोनावरील दुसरी लस घेतल्यानंतर 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
बातम्या

भिवंडी: कोरोनावरील दुसरी लस घेतल्यानंतर 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

भिवंडी: देशात आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जोमाने सुरुवात झाली आहे. यासाठी अनके ठिकाणी लोकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, यादरम्यान एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल (2 मार्च) ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एका लसीकरण केंद्रावर कोव्हिड-19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पण हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबतचं नेमकं कारण हे पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच समोर येणार आहे. मात्र, ही घटना समोर आल्यानंतर भिवंडीसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव सुखदेव किरदत असं असून तो भिवंडीतील डोळ्यांचा डॉक्टरांकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यामुळे तो फ्रंटलाइन वर्कर या प्रकारात मोडत असल्याने त्याने 28 जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर काल (मंगळवार) त्याने कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. पण हा डोस घेतल्यानंतर त्याचा काही वेळाने मृत्यू झाला. सुखदेव हा मूळचा ठाण्यातील रहिवासी आहे.

त्यावेळी नेमकं काय झालं?

28 जानेवारीला पहिली लस घेतल्यानंतर काल (2 मार्च) सुखदेवला दुसरा डोस घ्यायचा होता. त्यामुळे तो भिवंडीतील लसीकरण केंद्रावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास पोहचला. दुसरा डोस दिल्यानंतर सुखदेवला काही वेळासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. पण काही वेळानंतर सुखदेव हा बेशुद्ध पडल्याचे आढळून आले. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्याला तात्काळ भिवंडीच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथे पोहचण्यापूर्वीच सुखदेवचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, डॉक्टरांनी सुखदेव याचा मृतदेह फॉरेन्सिक पोस्टमार्टमसाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठविला आहे. सूत्रांनी याबाबत अशी माहिती दिली आहे की, सुखदेव याच्या मृत्यूमागील नेमकं कारण पोस्टमार्टमनंतरच समजू शकेल. भिवंडी लसीकरण केंद्रातील डॉक्टरांनी सुखदेवला दुसरी लस टोचण्यापूर्वी हृद्याचे ठोके आणि रक्तदाब तपासण्यात आलं होतं. जे सामान्य होतं. सूत्रांनी याबाबत अशीही माहिती दिली की, सुखदेवला उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि त्यासाठी तो औषधं देखील घेत होता.

पाहा यासंबंधी भिवंडी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याने काय माहिती दिली

भिवंडी-निजामपूर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. के आर खरात यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, ‘संबंधित व्यक्तीला लस दिल्यानंतर सुमारे वीस मिनिटांनंतर चक्कर येऊ लागली आणि साधारण तीस मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला असा आमचा अंदाज आहे. याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी खुलासा केला आहे की, त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. आम्ही त्याच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी जेजे रुग्णालयाच्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत.’

ही बातमी देखील नक्की पाहा: धक्कादायक! ‘या’ लॅबवर कारवाई, कोरोना चाचणीस बंदी; कारण…

दुसरीकडे सुखेदवच्या अचानक मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी सुखदेवच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा भिवंडीत एकच खळबळ माजली. त्यामुळे पोलिसांनी रुग्णलयाबाहेर कडक बंदोबस्त ठेवला आहे. या घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven − six =

भर कार्यक्रमात कपिल शर्मा पडला आमिर खानच्या पाया प्रसिद्ध गायिकेचं विमानात लाजिरवाण कृत्य, चाहत्यांकडून संताप व्यक्त ‘माही भाई तुमच्यासाठी काहीपण..’ जाडेजाचं धोनीसाठी मनाला भिडणारं ट्विट! CSK च्या दणदणीत विजयानंतर जाडेजाची पत्नी भावूक, मारली घट्ट मिठी! नाच रे मोरा… बाबा बागेश्वरचा मोरासोबत डान्स, Video पाहिलात का? IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महिलेची पोलिसाला मारहाण, Video व्हायरल Rutuja Bagwe : ही आपली मराठमोळी अभिनेत्री ऋतुजाच आहे बरं! Virgin Mojito चे नाव ‘व्हर्जिन’ का? ‘ही’ आहे त्यामागची कहाणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनी नंतर करिअरच सोडलं, कारण… IPL 2023 : झिवाची प्रार्थना देवाने पुन्हा ऐकली, CSK च्या विजयानंतर Photo व्हायरल! Kriti Sanon: सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री नाशिकच्या काळाराम मंदिरात ‘या’ चुका कराल तर, कधीच वजन कमी होणार नाही! समजून घ्या Paresh Rawal : बॉसच्या मुलीवरच जडला जीव, 12 वर्ष डेटिंग नंतर…; अभिनेत्याची भन्नाट लव्हस्टोरी ‘वीर सावरकरां’च्या भूमिकेसाठी रणदीपने घटवलं 26 किलो वजन, केलं कडक डाएट! आमिर खानच्या मुलीचा रिक्षातून प्रवास, साधेपणा दाखवूनही ट्रोल बिकिनीवरून टोकलं, नोकरी सोडून बनली अडल्ट मॉडेल अल्पवयीन साक्षीच्या डोक्याचा चेंदामेंदा करणारा नराधम बॉयफ्रेंड सापडला! Karishma Kappor चा फिटनेस फ्रिक डाएट, 48 व्या वर्षीही कमालीची फिगर कधी अंबानी कुटुंब, तर कधी बॉलिवूड स्टार्ससोबत; सगळीकडे दिसणारा ‘ओरी’ कोण? महिलेने सांगितले श्रीमंत पतीचे तोटे; यूजर्स म्हणाले, ‘जास्त पैसे असतील तर..’