Jio च्या 'या' प्लॅनसह Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar मिळणार फ्री!

Jio postpaid plans: जिओच्या अनेक पोस्टपेड प्लॅनमध्ये बऱ्याच OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन हे मोफत देण्यात आले आहेत. पाहा कोणकोणते आहेत हे प्लान्स.
Jio च्या 'या' प्लॅनसह Netflix, Amazon Prime आणि Disney+ Hotstar मिळणार फ्री!
free subscription netflix Amazon Prime Disney Hotstar Jio postpaid plans(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: Jio चे अनेक प्लॅन्समध्ये विविध OTT सबस्क्रिप्शन मोफत देण्यात येत आहेत. जिओच्या काही प्लॅन्समध्ये Netflix Mobile, Amazon Prime आणि Disney+ Hotstar यांचं सबस्क्रिप्शन मोफत दिलं जात आहे. जाणून घ्या जिओच्या कोणकोणत्या प्लॅन्समध्ये OTT सबस्क्रिप्शन आपल्याला मोफत मिळणार

जिओच्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लस प्लॅनमध्ये Netflix Mobile, Amazon Prime आणि Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन मोफत दिलं जात आहे. या प्लॅनसह, यूजर्संना 75GB डेटा दिला जातो. यामध्ये अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस देखील दररोज मिळणार आहे. हा प्लान 200GB डेटा रोलओव्हरसह येतो.

जिओच्या 599 रुपयांच्या पोस्टपेड प्लस प्लॅनमध्ये Netflix Mobile, Amazon Prime आणि Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. या प्लॅनसह, यूजर्संना 100GB डेटा मिळणार आहे. फॅमिली प्लॅनमुळे त्यात अतिरिक्त सिमही दिला जात आहे. या प्लॅनसह अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 SMS दिले जाणार आहे.

जिओचा 799 रुपयांचा पोस्टपेड प्लस प्लानमध्येही Netflix Mobile, Amazon Prime आणि Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये 150GB डेटा आणि 200GB डेटा रोलओव्हर मिळणार आहे. तसेच वरच्या प्लॅनमध्ये जे फायदे आहेत ते देखील मिळणार आहेत.

जिओच्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लस प्लानमध्ये तीन अतिरिक्त सिम कार्डसह 200GB डेटा देण्यात आला आहे. यात 500GB डेटा रोलओव्हर मिळतो. यासह अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 100 SMS दररोज दिले जातात. या प्लॅनमध्ये Netflix Mobile, Amazon Prime आणि Disney+ Hotstar यांचं मोफत सबस्क्रिप्शन असणार आहे.

free subscription netflix Amazon Prime Disney Hotstar  Jio postpaid plans
FB, What's App नंतर आता Gmail झालं डाऊन, मेल पाठवण्यात येत आहेत अडचणी

जिओच्या 1,499 रुपयांच्या पोस्टपेड प्लस प्लानमध्ये 300GB डेटा देण्यात आला आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल आणि 100 SMS दररोज दिले जातात. यामध्ये 500GB डेटा रोलओव्हर देण्यात आला आहे. तसेच Netflix Mobile, Amazon Prime आणि Disney+ Hotstar या OTT प्लॅटफॉर्मचं मोफत सबस्क्रिप्शन देखील देण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.