औरंगाबाद : विकृत चालकाने ‘तो’ प्रश्न विचारताच तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी
वसईतल्या श्रद्धा पालकर हत्याकांडांची चर्चा राज्यभर सुरू असताना औरंगाबादमध्ये संतापजनक घटना समोर आलीये. ट्यूशन संपल्यानंतर घरी जात असलेल्या तरुणीला भरधाव रिक्षातून उडी मारावी लागली. रिक्षाचालकांने तरुणीला अश्लील प्रश्न विचारत वेगात रिक्षा पळवल्यानं ही घटना घडली. यात तरुणी जखमी झाली असून, आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केलीये. औरंगाबादेत तरुणीची भरधाव रिक्षातून उडी, काय घडलं? पीडित तरुणी औरंगाबादमधील […]
ADVERTISEMENT

वसईतल्या श्रद्धा पालकर हत्याकांडांची चर्चा राज्यभर सुरू असताना औरंगाबादमध्ये संतापजनक घटना समोर आलीये. ट्यूशन संपल्यानंतर घरी जात असलेल्या तरुणीला भरधाव रिक्षातून उडी मारावी लागली. रिक्षाचालकांने तरुणीला अश्लील प्रश्न विचारत वेगात रिक्षा पळवल्यानं ही घटना घडली. यात तरुणी जखमी झाली असून, आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केलीये.
औरंगाबादेत तरुणीची भरधाव रिक्षातून उडी, काय घडलं?
पीडित तरुणी औरंगाबादमधील एका महाविद्यालयात बारावी वर्गात शिकते. ती नीट परीक्षेचीही तयारी करतेय. ‘नीट’चा क्लास संपल्यानंतर तिने शहरातील उस्मानपुरा भागातील गोपाल टी पॉईंटपासून एक रिक्षा पकडली.
रिक्षातून घरी जात असताना ती एकटीच असल्याचं पाहून रिक्षाचालक तिच्याशी बोलू लागला. शिक्षण आणि तिच्या कुटुंबियांविषयी त्याने चौकशी केली. रिक्षा चालक वडिलांच्या वयाचा असल्यानं तिने सुरुवातीला काही प्रश्नांची उत्तरं दिली.
भयंकर! आईने पकडून ठेवलं अन्…; धडावेगळं केलेलं शीर घेऊन भाऊ लोकांना म्हणाला ‘पाहा, हिचं काय केलं’