निवडणूकीत भाजपविरुद्ध उतरलेल्या मगो पक्षाने का दिला भाजपला पाठींबा? सुदीन ढवळीकर म्हणतात...

मी भाजपकडे पाठींब्यासाठी गेलेलो नाही,केंद्रीय नेतृत्वाचा मला फोन आल्यामुळे घेतला निर्णय - ढवळीकर
निवडणूकीत भाजपविरुद्ध उतरलेल्या मगो पक्षाने का दिला भाजपला पाठींबा? सुदीन ढवळीकर म्हणतात...
फोटो सौजन्य - राकेश साळसकर

गोवा विधानसभा निवडणुक मतमोजणत एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत भाजपने पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या दिशेने आगेकूच केली आहे. विधानसभेत त्रिशंकु परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता, परंतू भाजपने २० जागा जिंकत तीन अपक्ष आणि मगो पक्षाच्या साथीने पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याचं ठरवलं आहे. निवडणुकीत तृणमुल काँग्रेससोबत युती करुन भाजपविरुद्ध मैदानात उतरलेल्या महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाने निकालानंतर भाजपला का पाठींबा दिला याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

मगो चे नेते सुदीन ढवळीकर यांनी या विषयावर मुंबई तक शी बोलताना आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

निवडणूकीत भाजपविरुद्ध उतरलेल्या मगो पक्षाने का दिला भाजपला पाठींबा? सुदीन ढवळीकर म्हणतात...
Goa Result : मीच मुख्यमंत्री होणार ! डॉ. प्रमोद सावंत यांना आत्मविश्वास

मगो ने भाजपला पाठींबा दिल्याबद्दल गोव्यातील काही भाजप नेते नाराज असल्याचं कळतंय. परंतू ढवळीकर यांनी मला भाजपमधील नाराज नेत्यांची चिंता नाही असं सांगितलं आहे. "आमच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या भाजप नेत्यांच्या नाराजीची मला चिंता नाही. मी भाजपला पाठींबा द्यायला गेलेलो नाही. केंद्रीय नेतृत्वातून अमित शहा आणि जे.पी.नड्डा यासारख्या नेत्यांचा मला फोन आला म्हणून गोव्याच्या हीताचा विचार करुन आम्ही भाजपला पाठींबा दिला", असं ढवळीकर म्हणाले.

निवडणूकीत भाजपविरुद्ध उतरलेल्या मगो पक्षाने का दिला भाजपला पाठींबा? सुदीन ढवळीकर म्हणतात...
गोव्यात काँग्रेसला हरवण्यासाठी ममता बॅनर्जींची भाजपला मदत - अधीर रंजन चौधरींचा आरोप

सध्याच्या परिस्थितीत गोव्यात स्थिर सरकार आणण्यासाठी भाजपला मदत करणं ही आमची जबाबदारी असल्याचं आम्ही मानतो असं सुदीन ढवळीकर म्हणाले. आम्हाला लोकांना पुन्हा एकदा निवडणुकीला मतदान करायला भाग पाडायचं नाहीये, असंही ढवळीकर यांनी स्पष्ट केलं. भविष्यात भाजपसोबत झालेल्या मतभेदांचा विचार करुन पुन्हा त्यांना पाठींबा देणं सोपं होतं का असा प्रश्न सुदीन ढवळीकरांना विचारण्यात आला.

निवडणूकीत भाजपविरुद्ध उतरलेल्या मगो पक्षाने का दिला भाजपला पाठींबा? सुदीन ढवळीकर म्हणतात...
Election Results 2022 : उत्तर प्रदेश ते गोवा... कुणाला किती मिळाल्या जागा? बघा अंतिम निकाल

ज्याला उत्तर देताना ढवळीकर यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वतःहून पुढाकार घेत फोन केल्यामुळे गोव्याच्या जनतेसाठी आम्ही पाठीमागचं विसरुन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. "भूतकाळात काय झालंय हे विसरता येणार नाही. आमच्यासोबत काय झालं हे असं विसरता येणार नाही पण आता पुढचाही विचार करावा लागेल. विरोधात राहून गोव्यातील जनतेसाठी काही करता येईल का...म्हणून मी भाजपला बिनशर्त पाठींबा दिला. परंतू भाजपने मागच्या वेळसारखा आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करु नये. पुढील पाच वर्षांसाठी सर्व निर्णयांमध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे", हे देखील मी भाजपला सांगितल्याचं ढवळीकर म्हणाले.

निवडणुक निकाल जाहीर होण्याआधी मगो पक्षाने आपण किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचं जाहीर केलं होतं. एक्झिट पोलमध्ये मगो पक्षाला किमान ५ ते ७ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतू प्रत्यक्षात असं घडलं नाही, त्यामुळे निवडणुक निकालांनंतर ढवळीकर यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय भाजपला पाठींबा देण्याचं ठरवलंय. भाजप आणि आम्ही नैसर्गिक साथीदार आहोत. जेव्हा भाजपने गोव्यातील राजकारणात पाऊल ठेवलं त्यावेळपासून आम्ही त्यांना मदत करत आहोत. आजही आमचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्रीपदाबाबत मी कोणतंही वक्तव्य करणार नाही. तो निर्णय भाजपचा आहे. ज्यावेळी केंद्रातून निरीक्षक येतील, तेव्हा जर त्यांनी मला उपस्थित रहायला सांगितलं तर मी हजर राहीन असं ढवळीकर म्हणाले.

निवडणूकीत भाजपविरुद्ध उतरलेल्या मगो पक्षाने का दिला भाजपला पाठींबा? सुदीन ढवळीकर म्हणतात...
Goa Result : मुख्यमंत्रीपदाची कमान प्रमोद सावंतांच्या हातात नाही? फडणवीसांचं सूचक विधान

Goa Revolutionary Party मुळे यंदा मगो पक्षाला फटका बसल्याचं ढवळीकर यांनी मान्य केलं. केंद्रातील पक्षाने या पार्टीला मदत केली हे आम्हा सर्वांना माहिती आहे. जर तुम्ही तृणमुलचं विचारणार असाल तर त्यांना इथे स्थिरावण्यासाठी आणखी काही कालावधी जावा लागेल. काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही, नाहीतर निवडणुकीआधीच आम्ही त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे गोव्याला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही भाजपला पाठींबा देत असल्याचं ढवळीकर यांनी सांगितलं.

निवडणूकीत भाजपविरुद्ध उतरलेल्या मगो पक्षाने का दिला भाजपला पाठींबा? सुदीन ढवळीकर म्हणतात...
गोव्याच्या 'राज ठाकरें'चा वाघ आता विधानसभेत, म्हणाले तो गरजणार...

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in