मातोश्रीची लाईट बंद केल्याशिवाय यांना करंट बसणार नाही – मेघना बोर्डीकरांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई तक

राज्यात कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे होत असलेल्या लोडशेडींगचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी भारनियमन सुरु झालं असून कृषी पंपांनाच्या वीज कनेक्शनवरही याचा परिणाम होतो आहे. राज्यातील या परिस्थितीवरुन भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी सरकारवर निशाणा साधत, मातोश्रीची लाईट बंद केल्याशिवाय यांना करंट बसणार नाही असं वक्तव्य केलं आहे. परभणीत भाजप किसान मोर्चाच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे होत असलेल्या लोडशेडींगचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी भारनियमन सुरु झालं असून कृषी पंपांनाच्या वीज कनेक्शनवरही याचा परिणाम होतो आहे. राज्यातील या परिस्थितीवरुन भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी सरकारवर निशाणा साधत, मातोश्रीची लाईट बंद केल्याशिवाय यांना करंट बसणार नाही असं वक्तव्य केलं आहे.

परभणीत भाजप किसान मोर्चाच्या वतीने आज कृषी पंपांच्या वीज कनेक्शन तोडणीबद्दल जवाब दो मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बोलत असताना बोर्डीकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“शिवसेनेचं हिंदुत्वच ओरिजनल, बाकी सगळे….”

मुख्यमंत्री मंत्रालयात आले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी दररोज मंत्रालयातील विविध विभागांचा आढावा घेऊन माझ्या राज्यातील जनता कशामुळे त्रस्त आहे याचा आढावा घ्यायला हवा. परंतू मुख्यमंत्र्यांना वेळ आहे कुठे? मातोश्रीची वीज ठरवून 24 तास बंद करुया, तेव्हा विना लाईट काय हाल होतात हे त्यांना कळेल. मातोश्रीची लाईट बंद केल्याशिवाय यांना करंट बसणार नाही, असं आंदोलन करावं लागेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp