Health: सगळीकडे खो खो! हार्ट अटॅकसह तापाचे रुग्ण वाढले, तज्ज्ञांकडून महत्त्वाचा सल्ला

मुंबई तक

Heart Attack, Cough and Viral Fever : देशभरात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांमध्ये हार्ट अटॅक (Heart Attack) येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. यामधील अनेक गंभीर प्रकरणे देखील समोर आले होते. यासोबतच सध्या नागरीकांना सर्दी, खोकला ताप आणि घसा खवखवण्याच्या समस्याही भेडसावत आहेत. या आजारातील काही आजार आठवडा आठवडा बरे होत नाहीत. त्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Heart Attack, Cough and Viral Fever : देशभरात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांमध्ये हार्ट अटॅक (Heart Attack) येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. यामधील अनेक गंभीर प्रकरणे देखील समोर आले होते. यासोबतच सध्या नागरीकांना सर्दी, खोकला ताप आणि घसा खवखवण्याच्या समस्याही भेडसावत आहेत. या आजारातील काही आजार आठवडा आठवडा बरे होत नाहीत. त्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान नेमके हे आजार नागरीकांना का होतायत? यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे काय आहे? तसेच तज्ज्ञ डॉक्टरांनी (Specialist doctors) यावर काय उपाय सांगितले आहेत? हे जाणून घेऊयात.(heart attack seasonal fever and cough patient count increases specilist doctor told the reason)

हार्ट अटॅकच्या घटना वाढल्या?

देशातील अनेक राज्यात हार्ट अटॅकच्या (Heart Attack)घटना वाढल्या आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये गेल्या 10 दिवसात हार्ट अटॅकचे 5 रूग्ण आढळले आहेत. या पाचमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा समावेश आहे. या घटनेपुर्वी हैदराबादच्या सिकंदराबादमध्ये बॅडमिंटन खेळताना एका व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता.महाराष्ट्राच्या नांदेडमध्येही नाचत असताना एका मुलाला हार्ट अटॅक आला होता. तसेच गुजरातमधील अहमदाबाद येथे क्रिकेट सामन्या दरम्यान एका जीएसटी कर्मचाऱ्याची हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गुजरातमध्येही 7 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणातील नागरीकांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते.

Nagpur : भयंकर! अल्पवयीन मुलीने youtube बघून केली स्वतःची प्रसुती अन्…

तरूणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण का वाढतेय?

तरूणांमध्ये वाढत्या हार्ट अटॅकच्या (Heart Attack) घटनांवर जयपूरचे हार्ट स्पेशालिस्ट डॉ. गोविंद शरण शर्मा म्हणतात की, हार्ट अटॅक याआधी फक्त 60 वर्ष वयोगटातील नागरीकांना यायचा, पण आता 20 ते 30 वयोगटातील तरूणांना देखील येतो आहे. याला वाईट जीवनशैली, ताणतणाव, मद्यपान आणि धुम्रपाण कारणीभूत असल्याचे ते म्हणतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp