महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी! १६ गावातील एकूण ४१४ कुटुंबातील १९३२ नागरीकांचे स्थलांतर
मागील दोन आठवड्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा तढाखा वाढला आहे. या पावसामुळे अनेक गावातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. याचा मोठ्याप्रमाणात फटका महाबळेश्वर तालुक्यातील गावांना बसला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील १६ गावातील ४१४ कुटुंबातील १९३२ नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. काहींनी आपल्या नातेवाईकांकडे आपला मुक्काम हलवला […]
ADVERTISEMENT

मागील दोन आठवड्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा तढाखा वाढला आहे. या पावसामुळे अनेक गावातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. याचा मोठ्याप्रमाणात फटका महाबळेश्वर तालुक्यातील गावांना बसला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील १६ गावातील ४१४ कुटुंबातील १९३२ नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. काहींनी आपल्या नातेवाईकांकडे आपला मुक्काम हलवला आहे, तर काहींना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले आहे.
महाबळश्वेर तालुक्यातील या गावांना बसला अतिवृष्टीचा फटका
महाबळेश्वर तालुक्यातील दुधोशी, घावरी, येरणे बुद्रुक, येरणे खुर्द , एरंडल, चतुरबेट, भेकवलीवाडी, मालुसर, चिखली, माचुतर, शिंदोळा, धावली, नावली, झांझवड, मोरणी या १६ गावातील ४१४ कुटुंबातील सुमारे १९३२ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गेली दोन आठवडे महाबळेश्वर तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, तालुक्यातील अनेक नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही गावे दरड, प्रवण व पूर भागात असल्याने तेथील कुटुंबाचे प्रशासनाने युध्द पातळीवर स्थलांतर केले आहे.
पुरग्रस्तांचा मुक्काम शाळा आणि मंदिरात
कुंभरोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कुल, सौंदरी येथील प्राथमिक शाळा, शिंदोळा येथील प्राथमिक शाळा व गणेश मंदीर तर धावली येथील जन्नीमाता मंदीर व प्राथमिक शाळेसह दोन खाजगी बंगले देखील घेण्यात आले आहेत. कुंभरोशी येथील हायस्कुलमध्ये स्थलांतरीत केलेल्या कुटुंबांची तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी भेट घेवून त्यांना दिलासा दिला.