पुढील चार तासांत मुसळधार! पुण्यासह राज्यातील ‘या’ भागांना इशारा
पावसाने परतीचा मार्ग धरला असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून याचा परिणाम देशातील इतर भागांबरोबरच राज्यात दिसून येत आहे. राज्यातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होत असून, आजही पुढील तीन ते चार तासांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाड्याचा भाग, […]
ADVERTISEMENT

पावसाने परतीचा मार्ग धरला असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून याचा परिणाम देशातील इतर भागांबरोबरच राज्यात दिसून येत आहे. राज्यातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होत असून, आजही पुढील तीन ते चार तासांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाड्याचा भाग, पालघर, पुणे आणि विदर्भातील काही भागात मध्यम ते तीव्र ढग दिसत असून, पुढच्या 3 ते 4 तासात या भागात गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अहमदनगर भागात पाउस सुरू आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.
9 Oct,Latest satellite obs at 3.20 pm: उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा भाग, पालघर पुणे आणी विदर्भ काही भाग, मध्यम ते तिव्र ढग दिसत असून पुढच्या 3,4 तासात या भागात गडहडाटासहीत जोरदार पावसाची शक्यता….
ऑलरेडी अहमदनगर भागात पाउस… pic.twitter.com/rH7xCSEMEi— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 9, 2021
या जिल्ह्यांना इशारा
आज (9 ऑक्टोबर) रात्रीपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
8 Oct:
येत्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणो गडगडाट सहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता..
गडगडाट होत असताना व विजा चमकत असताना कृपया बाहेर जाणे टाळा किंवा योग्य आसरा घ्या ..@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/0T8pwE2fRP— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 8, 2021
उद्या कसं असेल हवामान?
उद्याही (10 ऑक्टोबर) मुंबई, पुण्यासह राज्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
11 ऑक्टोबर रोजी कोकण-पश्चिम महाराष्ट्राला इशारा
11 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.