पुणे हादरलं! आठवीत शिकणाऱ्या मुलीवर कोयत्याने वार, एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा अंदाज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेलं पुणे पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे हादरलं आहे. आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटू मुलीवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. या घटनेत मुलीचा जागेवरच मृत्यू झाला असून हा हल्ला आरोपीने एकतर्फी प्रेमातून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

क्षितीजा अनंत व्यवहारे असं या मुलीचं नाव असून आरोपीचं नाव शुभम भागवत असं आहे.

या घटनेबद्दल पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षितिजा अनंत व्यवहारे ही मुलगी सायंकाळच्या सुमारास कबड्डीच्या सरावा करीता आली होती. तेव्हा त्या मुलीच्या नात्यातील हृषिकेश ऊर्फ शुभम भागवत हा त्याच्या मित्रा सोबत दुचाकीवरून आला.काही समजण्याच्या आत क्षितिजावर कोयत्याने आणि चाकूने सपासप वार केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुण्यातील संतापजनक घटना! 14 वर्षाच्या मुलीचं अपहरण; आठ जणांनी केला सामूहिक बलात्कार

यानंतर आरोपीने क्षितीजासोबत असलेल्या मैत्रिणींना धमकावून पळवून लावलं. यानंतर आरोपीही घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. क्षितीजाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांना घटनास्थळी एक पिस्तूल आढळून आलं असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

ADVERTISEMENT

पुण्यात अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, गोळी झाडून ठार करण्याचाही प्रयत्न

ADVERTISEMENT

महिन्याभरापूर्वी पुणे शहर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं हादरलं होतं. एका 14 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून 8 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. पीडित मुलगी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे गेली होती. तेव्हा तेथील एक रिक्षाचालक तिचा विश्वास संपादन करून रिक्षामधून एका खोलीत घेऊन गेला. तिथे गेल्यावर तिच्यावर 8 जणांनी बलात्कार केला. अत्याचार करणाऱ्या नराधमांमध्ये 6 रिक्षाचालक आणि दोन रेल्वेमध्ये कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे 8 ही आरोपींची ओळख पटवली आणि आरोपींना काही तासांतच बेड्या ठोकल्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT