हो मी मिळवला सीडीआर, ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा: फडणवीस - Mumbai Tak - i got the cdr but investigate those who committed murder said devendra fadnavis - MumbaiTAK
बातम्या

हो मी मिळवला सीडीआर, ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा: फडणवीस

मुंबई: मनसुख हिरेन यांच्या फोन कॉलचे डिटेल्स (सीडीआर) विरोधी पक्ष नेत्यांकडे आले कुठून असा प्रश्न काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केल्यानंतर विधानसभेत एकच विरोधकांनी एकच गदारोळ केला. यालाच उत्तर देताना फडणवीसांनी सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत. ‘गृहमंत्री माझी चौकशी करा, हो मी मिळवला सीडीआर… अरे ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा, ज्यांनी […]

मुंबई: मनसुख हिरेन यांच्या फोन कॉलचे डिटेल्स (सीडीआर) विरोधी पक्ष नेत्यांकडे आले कुठून असा प्रश्न काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केल्यानंतर विधानसभेत एकच विरोधकांनी एकच गदारोळ केला. यालाच उत्तर देताना फडणवीसांनी सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत. ‘गृहमंत्री माझी चौकशी करा, हो मी मिळवला सीडीआर… अरे ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा, ज्यांनी खून केला त्याला पाठीशी घालता?’ असं म्हणत फडणवीसांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये नेमकं काय घडलं?

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाने जोरदार लावून धरली आहे. यावरुन सभागृहात प्रचंड गदारोळ घालण्यात आला आहे. मात्र, याचवेळी नाना पटोले यांनी एक असा मुद्दा उपस्थित केला की, ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण विरोधी पक्षाने एक गदारोळ घातला.

‘विरोधी पक्ष नेत्यांकडे सीडीआर आला कुठून, त्यांची चौकशी करा’

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाने केल्यानंतर नाना पटोले यांनी याबाबत बोलताना असं म्हटलं की, ‘मुकेश अंबानींच्या घराबाहेर या गाड्या जाऊ कशा शकतात. हे कोणी केलं? हा कोणाचा प्लॅन होता? हा सीडीआर विरोधी पक्षनेत्यांकडून कुठून आला?’

Sachin Vaze नी माझ्या पतीची हत्या केल्याचा संशय-विमला हिरेन

फडणवीसांनी नेमकं काय दिलं उत्तर?

नाना भाऊ मी मिळवला सीडीआर… करा माझी चौकशी, गृहमंत्री माझी चौकशी करा. मी मिळवला सीडीआर… अरे ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा, ज्यानी खून केला त्याला पाठीशी घालता. या सभागृहात आम्हाला बोलायचा अधिकार आहे. धमकी देता का आम्हाला?… आम्ही घाबरत नाही, करा… करा माझी चौकशी करा. जर तुम्ही खुनी खुनी शोधला नाही तर त्याच्या पलिकडची माहिती मिळवीन. तो माझा अधिकार आहे.

सचिन वाझे नेमके आहेत तरी कोण?

सचिन हिंदुराव वाझे हे मूळचे कोल्हापूरचे असून त्यांचा जन्म 22 फेब्रवारी 1972 रोजी झाला. 1990 साली ते पोलीस दलात सामील झाले होते. सुरुवातीला त्यांची नियुक्ती गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात झाली होती. मात्र दोन वर्षातच म्हणजे 1992 साली त्यांची बदली थेट ठाण्यासारख्या शहरी भागात करण्यात आली होती. ठाण्यात बदली होऊन आल्यानंतर त्यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केली त्यामुळे ते नेहमीच चर्चेत होते. दरम्यान, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि दया नायक यांच्या टीममध्ये सचिन वाझे यांचा समावेश करण्यात आला होता.

“अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ चार महिने सचिन वाझेंकडे”

आपल्या 30 वर्षाच्या कार्यकाळात सचिन वाझे यांनी 63 गुन्हेगारांचं एन्काउंटर केलं आहे. त्यामुळे एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची पोलीस दलात ओळख निर्माण झाली होती. मुन्ना नेपाळी या कुप्रसिद्ध गुंडाचा खात्मा सचिन वाझे यांनीच केला होता. तेव्हापासून सचिन वाझे हे खूपच चर्चेत आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × four =

Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat! दिया मिर्झा ‘या’ एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, जाणून घ्या Fitness रूटीन! Weight Gain करायचंय? फक्त ‘ही’ एक गोष्ट खा, सप्लीमेंटची पडणार नाही गरज! ‘सुशांत सिंह राजपूत ओव्हर सेंसिटिव्ह…’, मुकेश छाबरांनी असं काय सांगितलं? ‘दुआओ मे याद रखना’, स्टार कोरिओग्राफर अडकला लग्नबंधनात! PHOTOS Kiara Advani च्या हॉट-टोन्ड फिगरचं खास सीक्रेट, कशी राहते एवढी Fit? Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग