पुणे: 'मी पण नथुराम झालो होतो', नाना पाटेकरांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

Nana Patekar: अमोल कोल्हे हे सध्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरुन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पण नाना पाटेकर यांनी त्यांची पाठराखण केली आहे.
i too had become nathuram godse nana patekar supported to amol kolhe pune
i too had become nathuram godse nana patekar supported to amol kolhe pune(फोटो : इंडिया टुडे)

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी एका सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. याचबाबत आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आपणही नथुराम गोडसेंची भूमिका केली होती. पण आपण त्यांचं समर्थन करतो असं होत नाही. असं म्हणत नाना पाटेकरांनी अमोल कोल्हे यांना पाठिंबा दिला आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

'अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत. त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तीस वर्षांपूर्वी मी देखील गोडसेंची भूमिका केली होती. मी भूमिका केली म्हणजे मी त्यांचं समर्थन करतो का? समर्थन केले असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. मला विचारलं तुम्ही गोडसेची भूमिका का केली? तर ते माझं उपजीविकेचं साधन आहे. यात माझी काय चूक आहे का? प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायची गरज नाही.'

'शिवाजी महाराजांची भूमिका केली त्यावेळी तुम्ही त्यांना का विचारले नाही, ही भूमिका का केली? त्यावेळी कलाकार म्हणून तुम्ही कोल्हे यांना मान्य केलं ना?' असा सवालही नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, किरण माने प्रकरणी जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नाना पाटेकर म्हणाले की, 'आजूबाजूला काय चुकीचं चाललंय याचं मला काही देणे घेणे नाही. मी माझं काम करत राहणे, माझी राजकीय भूमिका कशासाठी असावी? समाजाप्रती भूमिका काय? ते महत्त्वाचे. काम करत राहायचं आणि एक दिवस कापरासारखं विरून जायचं.' असं नाना पाटेकर म्हणाले.

पुण्यात एका कार्यक्रमात आलेले असताना नाना पाटेकर यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली आणि काही काळ त्यांच्याशी चर्चाही केली.

i too had become nathuram godse nana patekar supported to amol kolhe pune
काही गलिच्छ डॉक्टर मंडळीनी पेशाला काळीमा लावला: नाना पाटेकर

'अजित पवार हे खरोखरच चांगले नेते'

'अजित पवार हा माणूस जितके काम करतो त्याची जाहिरात कधी करत नाही. इमानाने गुपचूप काम करत राहतो. एखादी कुठली तरी चुकीची गोष्ट असेल तर तेवढीच अधोरेखित करता तुम्ही. त्यांनी केलेलं काम समोर आणा, तो खरंच चांगला नेता आहे. राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही. आम्हाला अधिक प्रसिद्धी मिळते.' असंही नाना पाटेकर यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in