कोरोनिलचा प्रचार कशासाठी? IMA चा आरोग्यमंत्र्यांना तिखट प्रश्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशन आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावर प्रचंड नाराज झाली आहे. कोरोनिलच्या प्रचारात तुम्ही काय करत होतात? असा प्रश्न डॉक्टरांच्या या संघटनेने आरोग्यमंत्र्यांना विचारला आहे. योगगुरू बाबा रामदेव यांच्या कोरोनिल औषधावरून वाद निर्माण झाला आहे. कोरोनाशी लढा देण्यास कोरोनिल प्रभावी आहे या औषधाला जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने मान्यता दिल्याचा दावा पतंजलीने केला आहे. मात्र WHO ने हा दावा फेटाळला आहे. यानंतर तुम्ही अशा खोटा प्रचार करणाऱ्या औषधांच्या कार्यक्रमात काय करत होतात? असा प्रश्न IMA ने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना विचारला आहे.

पतंजलीच्या कोरोनिल या औषधाचं लाँच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत झालं. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होते आहे. १९ फेब्रुवारीला कोरोनिल हे औषध लाँच करण्यात आलं होतं. या औषधाच्या लाँचिंगला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर आज टीका होते आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

IMA ने डॉ. हर्षवर्धन यांना काय प्रश्न विचारले आहेत?

तुम्ही आरोग्यमंत्री आहात मग देशासमोर असे खोटे दावे करणं कितपत योग्य आहे?

ADVERTISEMENT

तुम्ही केंद्रीय आरोग्यमंत्री आहात, चुकीची आणि अशास्त्रीय दावे असलेली गोष्ट लोकांसमोर लाँच कशी काय करू शकता?

ADVERTISEMENT

तुम्ही डॉक्टर असूनही जनसामान्यांच्या समोर कोणत्याही शास्त्राचा आधार नसलेली गोष्टी प्रमोट कशी काय करू शकता?

तुम्ही कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या ज्या औषधाची जाहिरात केलीत त्याची चाचणी कधी आणि केव्हा झाली याची माहिती द्या

या औषधाची चाचणी कशा प्रकारे करण्यात आली ?

या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलसाठी किती स्वयंसेवक हजर होते आणि चाचणी नेमकी कुठे करण्यात आली ?

असे प्रश्न आयएमएने उपस्थित केले आहेत आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT