मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट'

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; पुढील दोन दिवस संततधार
मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट'
मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज(फाइल फोटो, सौजन्य - PTI)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, ठाण्यासह राज्याच्या विविध भागात रविवारी रात्रीपासून पाऊस सुरू असून, पुढील दोन दिवसात पावसाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर मुबंईसह काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुंबई, ठाण्यासह कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई महानगर प्रदेशात पावसाची संततधार

गणरायाला निरोप देत असतानाच मुंबईत पावसाचा जोर वाढला. रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाची संततधार सोमवारी सकाळपर्यंत कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही पाऊस सुरु आहे. आज पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

आज कुठे कुठे असेल पाऊस?

हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे राज्यात आज ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

21 सप्टेंबरला राज्यभर मुसळधार?

राज्यात 21 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्र वगळता सर्वत्र ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.