Rape Case: बीड जिल्हा हादरला, वासनांध 23 वर्षीय तरुणाचा 8 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

in beed district a 23 year old man raped an 8 year old girl crime rape case
in beed district a 23 year old man raped an 8 year old girl crime rape case(प्रातिनिधिक फोटो)

रोहिदास हातागळे, बीड: बीड जिल्ह्याला हादरून सोडणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. एका 23 वर्षीय वासनांध तरुणाने अवघ्या 8 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. मागील काही दिवसात बीड जिल्ह्यात बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अंबाजोगाई तालुक्यामधील डोंगरपिंपळा गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठ वर्षीय चिमुकलीवर 19 मार्च 2022 शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर (वय 23) याने घरासमोर खेळत असलेल्या एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून बळजबरीने तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर त्या निष्पाप चिमुकलीला भयभीत करत हत्या करण्याची धमकी देखील नराधम आरोपीने दिली असल्याचं आता समोर आलं आहे. ही घटना अतिशय संतापजनक असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आता नातेवाईक करत आहेत.

याप्रकरणी मुलीच्या चुलत्याच्या फिर्यादीवरून आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर (वय 23) वर्षे रा.डोंगरपिंपळा ता.अंबाजोगाई याच्या विरोधात कलम 376, 376(2), 376(AB), 506 भादंवि 4, 6 पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी हे करत आहे. सदरील आरोपीला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. सध्या आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून आता या प्रकरणी सखोल तपास सुरु करण्यात आला आहे.

वडील-भावाकडून 11 वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार, तर आजोबा आणि मामाकडून विनयभंग

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील ताडीवाला रोड येथील एका 11 वर्षीय मुलीने तिच्यावर तब्बल 6 वर्षापासून वडील आणि भाऊ बलात्कार असल्याची अत्यंत घृणास्पद घटना आता समोर आली आहे. एवढंच नव्हे तर पीडित मुलीचे आजोबा आणि तिचा चुलत मामा यांच्या अत्याचाराला देखील तिला सामोरे जावे लागत असल्याचे आता उघड झाले आहे.

पीडित मुलीवर वडील आणि भाऊ हे सातत्याने बलात्कार करत होते. तर आजोबा आणि चुलत मामा हे वारंवार मुलीचा विनयभंग करत असल्याचा आरोप आता पीडित मुलीने केला आहे. या सगळ्या प्रकरणी आता बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

in beed district a 23 year old man raped an 8 year old girl crime rape case
उल्हासनगर : रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या गुन्हे निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध शाळा, महाविद्यालयमध्ये 'गुड टच अ‍ॅन्ड बॅड टच'बद्दल मुलींना माहिती दिली जात आहे.

याच अंतर्गत फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान ताडीवाला रोड येथील एका शाळेत अशाच स्वरुपाच्या लेक्चरचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये 11 वर्षीय मुलीने तिथे असलेल्या समुपदेशक आणि शिक्षकांना मागील सहा वर्षापासून विविध ठिकाणी तिच्यावर वडील, भाऊ या दोघांकडून बलात्कार झाल्याचे सांगितले तर आजोबा आणि चुलत मामाकडूनही विनयभंग होत असल्याचं तिने यावेळी सांगितलं.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in