Thane: विषारी सापाशी खेळ, युवकाने गमावले प्राण; घटना मोबाईलमध्ये कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंब्रा: अत्यंत विषारी सापाशी खेळ करणं जीवावर कसं बेतू शकतं हे पुन्हा एकदा एका घटनेवरून सिद्ध झालं आहे. ठाणेनजीक असलेल्या मुंब्र्यातील संजयनगर येथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणाला अशाच प्रकारच्या घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शेख नावाचा एक युवक टाईमपास करण्यासाठी मुंब्रा बायपास येथे आला होता. त्याचवेळी त्याला लाल किला ढाब्याजवळ एक अत्यंत विषारी साप दिसला. मुंब्रा परिसरातील डोंगराळ भाग असल्याने व डोंगरातच झोपड्या बांधल्याने पावसात अनेक वन्यजीव इथल्या वस्त्यांमध्ये घुसतात. त्यामुळे इथे साप दिसल्याने मोहम्मदने त्याला कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय पकडलं.

यावेळी मोहमदने फक्त सापला पकडलंच नाही तर सापाचे डोके आपल्या हातात धरून सापाला आपल्या गळ्याभोवती गुंडाळले. केवळ मजा म्हणून तो अशाप्रकारचं कृत्य करत होता. त्यावेळी त्याला हे देखील माहिती नव्हतं की, हा साप किती विषारी आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे मोहम्मद गळ्यात साप अडकवून त्याच अवस्थेत गावदेवी मार्केट परिसरात फिरत बसला. यावेळी अनेकांनी त्याला हटकलं देखील तसंच सापाला सोडून देण्यास देखील सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे, मोहम्मदचे मित्र त्याचे हे सगळे कृत्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते.

दरम्यान, सापासोबत खेळता-खेळता त्याची पकड सैल झाली आणि सापाने तब्बल तीन वेळा मोहम्मदला चावा घेतला. परंतु त्यावेळी त्याला काहीच जाणवले नाही. काही वेळाने त्याने सापाला एका झुडपात सोडून दिले. पण मोहम्मदने सापासोबत आधी जो खेळ सुरु अखेर तोच त्याच्यावर उलटला.

ADVERTISEMENT

कारण सापाने जो चावा घेतला होता. तो मोहम्मदचा जीवावर बेतला. कारण त्यामुळे मोहम्मदच्या शरीरात विष भिनलं होतं आणि काही वेळाने त्याला प्रचंड त्रास होऊ लागला होता.

ADVERTISEMENT

त्यामुळे त्याला तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आतापर्यंत अशा अनेक घटना आपल्यासमोर आल्या आहेत. मात्र, अनेक तरुण हे साप पकडण्याचं कोणतंही योग्य प्रशिक्षण न घेता उत्साहीपणे साप पकडण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचा हा उत्साहीपणा जीवावर देखील बेतू शकतो हेच या घटनेवरुन पुन्हा एकदा समोर आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT