Goodbye 2022: मुंबईकरानों, मुंबईत घडलेल्या ‘या’ घटना आठवतात का?
मुंबई: मुंबईकर सध्या 2022 वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2023 वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. पण, मावळत्या वर्षाला निरोप देण्यापूर्वी या वर्षात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काय घडलंय, हे तर जाणून घ्यायलाच हवं ना? 2022 मध्ये घडलेल्या काही चांगल्या घटनांचा घेतलेला हा आढावा… मुंबईत 2022 मध्ये कोणत्या घटना घडल्या ? मुंबईचा पहिल्या वंदे भारत रेल्वेची सुरूवात […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईकर सध्या 2022 वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2023 वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. पण, मावळत्या वर्षाला निरोप देण्यापूर्वी या वर्षात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काय घडलंय, हे तर जाणून घ्यायलाच हवं ना? 2022 मध्ये घडलेल्या काही चांगल्या घटनांचा घेतलेला हा आढावा…
मुंबईत 2022 मध्ये कोणत्या घटना घडल्या ?
मुंबईचा पहिल्या वंदे भारत रेल्वेची सुरूवात
या वर्षी ऑक्टोबर २०२२मध्ये मुंबईत पहिली वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली. गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या या सेमी-हायस्पीड वंदे भारत रेल्वेला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला होता. अनेक आधुनिक सुविधा आणि उत्तम इंटेरिअरने ही रेल्वे सुसज्ज आहे. या रेल्वे प्रवास करण्याचा नवा अनुभव प्रवाशांना लाभला.
बुलेट ट्रेनला मिळाली गती
मुंबई-अहमदाबाद दरम्यान प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मुंबईतील कामाला यंदा वेग आला. भूसंपादनासोबतच नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशनला बीकेसीमध्ये स्टेशन बांधण्यासाठी जागा मिळाली. त्याच्या उभारणीपुढील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
महानगरपालिका शाळांमध्ये मुलांची विक्रमी संख्या
मुलांच्या घटत्या पटसंख्येवरून वर्षानुवर्षे टीकेला सामोरे जाणाऱ्या महानगरपालिका शाळांचे दिवस आता बदलले आहेत. यावर्षी या शाळांमध्ये १ लाखांहून अधिक मुलांनी प्रवेश घेतला. पालकांनी प्रवेश अर्ज घेण्यासाठी रांगा लावल्या.